मेरी ख्रिसमस; हॅपी ख्रिसमस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:41 AM2017-12-25T01:41:17+5:302017-12-25T01:41:23+5:30

मुंबईत आणि मुंबईच्या आसपास जुनी चर्च आहेत. त्यातील काही चर्च ही ब्रिटिशांनी बांधलेली असून, अनेक चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने आजही ख्रिसमस मास साजरा केला जातो.

Merry christmas; Happy christmas | मेरी ख्रिसमस; हॅपी ख्रिसमस

मेरी ख्रिसमस; हॅपी ख्रिसमस

Next

मुंबईत आणि मुंबईच्या आसपास जुनी चर्च आहेत. त्यातील काही चर्च ही ब्रिटिशांनी बांधलेली असून, अनेक चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने आजही ख्रिसमस मास साजरा केला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने चमचमत्या ताºयांच्या प्रकाशात, थंडीमध्ये सांताची वाट बघत ख्रिसमस साजरा केला जातो. चर्चमध्ये कॅरोल गायन, मास सुरू असते. चर्चबाहेरील परिसरदेखील लोकांनी बहरून निघतो. चर्चमध्ये आकर्षक रोशणाईने परिसर उजळून निघतो. नाताळमध्ये खास आकर्षण असणारे ‘ख्रिसमस ट्री’ सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. चर्चबाहेर असे अनेक लहान-मोठे ख्रिसमस ट्री उभारले जातात. अशाच काहीशा आनंददायी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील उत्साही वातावरणाचा आढावा घेत, ‘लोकमत’ने या चर्चचे महत्त्वही विशद केले आहे.

होली क्रॉस चर्च
कुर्ला येथील ४३७ वर्षे जुने असलेले हे होली क्रॉस चर्च इ.स. १५८० मध्ये बांधण्यात आले. दरवर्षी येथे ५ हजार ते ६ हजार संख्यने लोक ख्रिसमसच्या आदल्या रात्री येतात आणि सलग २ तास कॅरोल, मास सुरू होते. त्यानंतर सर्वांना कॉफी आणि केक दिला जातो. रविवारी येथे प्रत्येक भाषेमध्ये मास केला जातो. सकाळी ६ वाजता मराठीतून, ७ वाजता इंग्रजीमधून, ८ वाजता लहान मुलांसाठी, ९.१५ ला इंग्रजीमधून, संध्याकाळी ६ वाजता कोकणी ,तर संध्याकाळी ७ वाजता पुन्हा इंग्रजी मधून मास केले जाते. नाताळनिमित्त येथे सोमवारी मराठी संगीतमय नाटक सादर होणार आहे.

सेंट अँथोनी चर्च, मानखुर्द (१५८५)
मानखुर्दमधील सेंट अँथोनी चर्च हे १५८५ साली पोर्तुगीजांनी बांधले. पार्तुगीजांनंतर इंग्रज या चर्चचा सांभाळ करत होते. २००२ साली या चर्चची पुनर्बांधणी करण्यात आली. मानखुर्द, गोवंडी, अणुशक्तीनगर, पांजरपोळ, मानखुर्द गाव, महाराष्टÑनगर, देवनार, मंडाळा, ट्राम्बे येथील ख्रिस्त बांधव प्रार्थनेसाठी या चर्चमध्ये येतात. नाताळच्या दिवशी शेकडो ख्रिस्त बांधव येथे एकत्र येतात. ख्रिस्त येण्याच्या काळानुसार नाताळचे वातावरण चर्चमध्ये पाहायला मिळते, तेव्हापासून चर्चमध्ये नाताळाची तयारी सुरू होते.यंदा ३ डिसेंबरमध्ये ख्रिस्त येण्याचा काळ सुरू झाला. या दिवसापासून ख्रिस्त बांधव उपवास करू लागतात.
स्क्रॅबची सजावट केली जाते, येशूची मूर्ती पाळण्यात ठेवली जाते. त्यासोबत येशूची आई मेरी आणि मेंढीही ठेवलेली असते. येशूला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम या वेळी केला जातो.मुलांना चर्चमध्ये केकचे वाटप केले जाते.

वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड येथील फादर एग्नेल आश्रमात उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातो. या वेळी २४ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता कॅरेल सिंगिंगचा कार्यक्रम केला जातो. रात्री १० वाजता मिस्सा (प्रार्थना) म्हटली जाते. त्यानंतर, ११.३० वाजता चहा दिला जातो आणि केक कापून तोंड गोड केले जाते, तसेच आश्रमातील अनाथ मुलांना मदत केली जाते. त्यांच्या नावे निधी जमा केला जातो, तसेच २५ डिसेंबरला सकाळी ७, ८ आणि ९.३० वाजता मिस्सा (प्रार्थना) म्हटली जाते.

शहर - उपनगरात कॅथलिक समूह वाढल्यानंतर कुर्ल्याच्या होली क्रॉस चर्चमध्ये गर्दी वाढली. तर फातिमा लेडी चर्च १९५३ मध्ये विद्याविहार येथे. १९६८ मध्ये कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ सेंट जोसेफ चर्च, १९७२ मध्ये साकीनाका येथे सेंट ज्यूड जेरी मेरी चर्च, १९७५ साली साकीनाका येथे सेंट अँथनी चर्च, १९८२ साली पेस्तमसागर येथे होली फॅमिली चर्च व १९८३ मध्ये इन्फांट (शिशू) येशू चर्च, घाटकोपर येथे उभारले गेले.

होली ट्रिनिटी
चर्च, पवई
पवई येथील होली ट्रिनिटी चर्च पवित्र मानले जाते. हे रोमन कॅथलिक चर्च असून, त्याची स्थापना १५५७ मध्ये पोर्तुगीजांनी केली. हे चर्च बॉम्बेच्या आर्चिओसीजच्या मालकीचे आहे. ख्रिसमसच्या आठवडाभर आधी येथे सजावट करण्यात येते. विविध रोशणाईने चर्च सजविण्यात येते. पताके, फुगे चर्चला लावले जातात.
ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच्या सायंकाळी कॅरोल गीत व मास सुरू असते. ख्रिसमस साजरा करण्यासाठी विविध भागांतून लोक एकत्र येतात. चर्चच्या परिसरात अनेक जुन्या वास्तूदेखील आहेत. चर्चची सजावट करून ख्रिसमस ट्री उभारण्यात आलेले आहे.
- फादर क्लॅरेन्स फोन्सका, होली ट्रिनिटी चर्च, पवई

कुपारी महोत्सव
वसईमध्ये वाडवळ ख्रिश्चन आणि कुपारी ख्रिस्ती असे दोन भाग पडतात. वसई भागात कुपारी ख्रिस्ती लोकांकडून २६ डिसेंबरला ‘कुपारी महोत्सवा’चे आयोजन केले जाते. कुपारी संस्कृतीवर आधारित ‘कुपारी महोत्सव’ साजरा होतो. शहर आणि गावातील लोक त्यात सहभागी होतात.

ख्रिसमसचा एक काळ असतो, त्याला ‘आगमन काळ’ असेही म्हणतात. चार आठवडे आणि एक महिन्यांपासून तयारी सुरू होते. आध्यात्मिक तयारीच्या वेळेला जेव्हा येशूचा जन्म झाला,त्या दिवसाची आठवण करून, त्यावर विचार- मनन केले जाते. येशू जन्मला म्हणजे परमेश्वर मनुष्य रूपात प्रकट झाला. येशूच्या कार्याची जाणीव यानिमित्ताने निमित्ताने केली जाते. ख्रिश्चन धर्मातील लोक सामाजिक कार्य करताना, समोरच्या व्यक्तीमध्ये येशू ख्रिस्ताला पाहतात. आम्हाला गीतेच्या माध्यमातून येशू ख्रिस्ताची शिकवण सहजरीत्या समजते. चर्चमध्ये विधी साजरा करताना दर वेळेस मिस्सा बळी केली जाते. येशूने आपल्या प्राणाची आहुती दिली, तो प्रसंग यानिमित्ताने आठवतो. येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या शिकवणीचे पालन केले जाते. - फादर जो परेरा, संस्थापक, क्रिपा फाऊंडेशन

गाण्यांची धून
चर्चमध्ये कॅरोल सिंगिंगचे आयोजन केले जाते. येशू ख्रिस्तांचा जन्म झाला त्याची नाटिका सादर केली जाते.

संकलन : सागर नेवरेकर, कुलदीप घायवट, अक्षय चोरगे

Web Title: Merry christmas; Happy christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.