Join us

मेरी ख्रिसमस

By admin | Published: December 24, 2015 1:48 AM

मास... सिंगिंग... डान्सिंग अ‍ॅण्ड पार्टी... गुलाबी थंडीत मोठ्या उत्साहात मुंबईत ख्रिसमस साजरा होतो. मुंबईत ख्रिसमसचा माहोल तयार झाला आहे.

मास... सिंगिंग... डान्सिंग अ‍ॅण्ड पार्टी... गुलाबी थंडीत मोठ्या उत्साहात मुंबईत ख्रिसमस साजरा होतो. मुंबईत ख्रिसमसचा माहोल तयार झाला आहे. ख्रिस्ती वस्त्यांबरोबरच हॉटेल्स, मॉल्समध्येही मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलीब्रेशन केले जाते. ख्रिसमसच्या दोन ते तीन दिवस आधीपासूनच ख्रिसमस सेलीब्रेशनची सुरुवात होते.मुंबईत कुर्ला पश्चिमेकडे ख्रिश्चन गाव, वांद्रे पूर्व-पश्चिम परिसर, गिरगावातील खोताची वाडी, सांताक्रूझ, बोरीवली येथील काही परिसर, विक्रोळी पश्चिम, डॉकयार्ड रोड, दादर परिसर, म्हातारपाखडी या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांची वस्ती आहे. त्यामुळे या परिसरात खास पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस साजरा करण्यात येतो. अनेक तरुण-तरुणी ख्रिसमस सेलीबे्रशन पाहण्यासाठी या परिसरात जातात. संध्याकाळी ख्रिस्ती वस्त्यांतून फेरफटका मारताना आता गिटार, पियानोचे सूर कानावर पडतात आणि त्याचबरोबरीने ‘जिंगल बेल जिंगल बेल, जिंगल आॅल द वे...,’, ‘विश यू ए मेरी ख्रिसमस...,’ अशा कॅरल्सचे शब्द कानावर पडतात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. ख्रिस्ती बांधव एकत्र जमून सायंकाळी कॅरल्स गात नाचतात. २४ डिसेंबरची सायंकाळ ख्रिसमस ईव्ह म्हणून साजरी केली जाते. या सायंकाळी ख्रिस्ती बांधवांचा उत्साह शिगेला पोहोचतो. कारण २४ डिसेंबरला रात्री १२ वाजता येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. २४ डिसेंबरला सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास एकत्र जमतात. त्यावेळी व्हायोलिन, गिटारचे वादन केले जाते. कॅरल्स गातात, नाचतात. सगळीकडे उत्साह असतो. ख्रिसमससाठी विशेष पेहराव त्यांनी केलेला असतो. रात्री १०च्या सुमारास सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. ख्राइस्ट मास म्हणजेच येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. रात्री १० ते १२ या वेळेत चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. रात्री १२ वाजता चर्चमध्ये घंटानाद केला जातो. त्यावेळी ख्रिस्ती बांधव जल्लोषात ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यानंतर ख्रिस्ती बांधव आपल्या सोसायटी, घरी परतात. काही ठिकाणी सोसायटीमध्ये किंवा घरी पार्टीचे आयोजन केलेले असते. रात्री १ नंतर ख्रिस्ती बांधवांची पार्टी सुरू होते. त्यावेळी ख्रिसमसचे विशेष पदार्थ, मद्यप्राशन केले जाते. त्यानंतर २५ डिसेंबरला सायंकाळी पुन्हा ख्रिस्ती बांधव सेलीब्रेशन करतात. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर एका राजाने सर्व नवजात बालकांना मारण्याचे हुकूम दिला होता, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे ख्रिसमसनंतर तीन दिवसांनी ‘फीस्ट’ साजरा करण्यात येतो. त्यावेळी बळी गेलेल्या बालकांच्या आठवणीसाठी हा फीस्ट साजरा करण्यात येतो. ३१ डिसेंबरपर्यंत ख्रिसमस सेलीब्रेशन केले जाते. गिरगावातल्या खोताच्या वाडीतील ख्रिसमसचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतात. परदेशात स्थायिक झालेले ख्रिसमससाठी खोताच्या वाडीत येतात. २५ डिसेंबरला सायंकाळी वाडीत सांताक्लॉज येतो. वाडीतील लहान मुले, मोठी माणसेही त्याच्याबरोबर गाणी म्हणत, नाचत वाडीभर फिरतात. सांटा लहान मुलांना भेटवस्तू, चॉकलेट वाटतो. १२ वर्षांखालील सर्व मुलांना खाऊ दिला जातो. गेल्यावर्षी ख्रिसमससाठी वाडीत ३५० मुले आले होती. यंदा अजून जास्त मुले येतील, असा अंदाज खोतवाडीतील रहिवाशांनी वर्तविला आहे. शहरातील विविध भागांमध्ये ख्रिसमसची धूम सुरू असते. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिस्ती बांधव दान करतात. घरात खास तयार केलेले अन्नपदार्थांचे तीन वाटे केले जातात. एक वाटा हा चर्चमध्ये नेऊन दिला जातो. हा वाटा तिथल्या गरीब व्यक्तींना दिला जातो. दुसरा वाटा हा नातेवाईक, शेजाऱ्यांना दिला जातो आणि तिसरा वाटा हा घरच्यांसाठी असतो. पण काही ठिकाणी अन्नपदार्थ देण्यापेक्षा आर्थिक मदत केली जाते. त्यासाठी ख्रिस्ती बांधव ठरवून ठरावीक रक्कम जमा करतात. ही रक्कम चर्चमध्ये दिली जाते. त्यानंतर फादर ही रक्कम गोरगरिबांना वाटतात अन्यथा अनाथाश्रमांस दिली जाते. ख्रिसमससाठी सजतात घरे... डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसचे वेध लागलेले असतात. त्यामुळे त्यांची तयारी सुरू होते. आता ख्रिसमसची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. ख्रिसमस डेकोरेशन स्टार, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज आणि गोठा यांना महत्त्व आहे. प्रत्येक घरात ख्रिसमससाठी खास सजावट केलेली असते. त्यात ख्रिसमस ट्रीला महत्त्व आहे. घराच्या एका कोपऱ्यात, बाल्कनीमध्ये ख्रिसमस ट्री उभे करण्यात येते. ही ख्रिसमस ट्री हिरव्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये असतात. ख्रिसमस ट्रीला लायटिंग केले जाते. त्यावर स्टीक्स, बॉल, बेल्स, सॉक्स, स्टारर्स, छोटा सांताक्लॉज, छोटे गिफ्ट बॉक्स लावून सजवण्यात येते. ‘ख्रिसमस ट्री’ गिफ्ट्स ठेवण्यात येतात. येशू ख्रिस्ताचा जन्म गोठ्यात झाला असल्यामुळे सजावटीचा एक भाग म्हणून घरात प्रातिनिधिक स्वरूपाचा गोठा तयार करण्यात येतो. वाळलेले गवत, पुठ्ठा, लाल माती, पुतळ््यांचा वापर करून सजवला जातो. येशूच्या जन्माचा प्रसंग या गोठ्याच्या रूपात उभा केला जातो. या गोठ्यात येशूची आई मारिया, वडील, लहान येशू, मेंढ्या, गायी यांचे पुतळे ठेवण्यात येतात. ख्रिसमससाठी घराच्या बाहेर स्टार (चांदणी) लावण्यात येते. घराला रोशणाई करण्यात येते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसचे वेध लागलेले असतात. त्यामुळे त्यांची तयारी सुरू होते. आता ख्रिसमसची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. ख्रिसमस डेकोरेशन स्टार, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज आणि गोठा यांना महत्त्व आहे. प्रत्येक घरात ख्रिसमससाठी खास सजावट केलेली असते. त्यात ख्रिसमस ट्रीला महत्त्व आहे. घराच्या एका कोपऱ्यात, बाल्कनीमध्ये ख्रिसमस ट्री उभे करण्यात येते. ही ख्रिसमस ट्री हिरव्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये असतात. ख्रिसमस ट्रीला लायटिंग केले जाते. सोशल मीडियावर ख्रिसमस फिवर केवळ ख्रिस्ती बांधवांपुरता मर्यादित नसलेला ‘ख्रिसमस’ अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, सध्या सोशल मीडियावर ख्रिसमस फिवर दिसून येतोय. नेटिझन्सनाही सांताक्लॉजचे वेध लागले असून फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ख्रिसमस पार्टीज आणि गिफ्ट्सची चर्चा रंगतेय.फेसबुकवर युझर्सना ‘ख्रिसमस’ स्पेशल पर्याय उपलब्ध झाला असून, त्या माध्यमातून यंदा सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळेल याचे सरप्राइझ समोर येत आहे. त्यामुळे सध्या सर्वच नेटिझन्स या पर्यायाच्या माध्यमातून सांताक्लॉजच्या गिफ्टची गंमत अनुभवताना दिसताहेत. याशिवाय इन्स्टाग्रामवर आठवडाभरापूर्वीच ‘रेड अँड व्हाइट’ फिवर आॅन आहे. बॉलीवूडचे सेलीब्रिटीही ख्रिसमससाठी व्हेकेशन मूड एन्जॉय करीत असून, त्यांच्या फोटोंची सध्या इन्स्टावर धूम आहे. त्यात रणबीर-कतरिना, शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, माधुरी दीक्षित, करणसिंग ग्रोव्हर- बिपाशा, प्रियंका यांच्या फोटोजने चाहत्यांना अक्षरश: भुरळ घातली आहे. ख्रिसमस पार्ट्यांचेही दमदार प्लॅनिंग सोशल मीडियावर सुरू आहे. बरेच नेटिझन्स व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग करून आपल्या ग्रुप्ससोबत हटके सेलीब्रेशनचे प्लॅन्स करताहेत. नाताळसाठी मुंबई आणि उपनगरांत मोठ्या जोमाने खरेदी सुरू आहे. घरसजावट, गोडधोड पदार्थ, ख्रिसमस गिफ्ट्स या सगळ्याबरोबरच तरुणीही नाताळसाठी विशेष तयारी करताना पाहायला मिळत आहे. या दिवसांत हटके दिसण्याची एकही संधी तरुणी सोडत नाही, म्हणूनच नखांवर सुंदर ‘नेल आर्ट’ करण्यासाठी तरुणींनी नेल आर्ट पार्लरमध्ये गर्दी केलेली आहे.नखे सजवण्यासाठी नेलपॉलिशच्या साहाय्याने केला जाणारा ‘नेल आर्ट’ हा प्रकार सध्या अनेकींच्या पसंतीला उतरला आहे. सुंदर चेहऱ्यासोबतच नखेही सुंदर असायला हवीत, या बदलत्या ट्रेंडमुळे सध्या अनेक तरुणी आवर्जून ‘नेल आर्ट’ करतात. यासाठी खास प्रशिक्षण दिले जाते. अगदी बारीक कलाकुसर करून केले जाणारे हे आर्ट नखांची शोभा वाढवते. यात नखांवर नेलपॉलिशच्या साहाय्याने कल्पकतेने अगदी बारीक बारीक नक्षी काढल्या जातात. सध्या मुंबईत नाताळचा फिवर असल्याने शॉपिंग मॉल्स, मोठमोठे पार्लर या ठिकाणी नेल आर्टची दुकाने नटलेली दिसत आहेत. विशेष म्हणजे तरुणीसुद्धा नेल आर्ट करून घेण्यास तितक्याच उत्सुक दिसत आहेत. ‘नेल आर्ट’ हा प्रकार अगदी कोणत्याही वयोगटातील मुलींना करता येऊ शकतो. त्यामुळे अगदी लहान लहान मुलीही नेट आर्टचा आनंद घेताना दिसत आहेत. यात खास नाताळसाठी असणाऱ्या सांताक्लॉज, सांता कॅप, रेनडिअर, स्नोफ्लेक्स, ख्रिसमस ट्री यांसारख्या डिझाइन्सना अधिक पसंती मिळत आहेत. यासोबतच लहान मुलींमध्ये नाताळ टच दिलेले कार्टुन कॅरेक्टरचे डिझाइन्स काढून घेताना दिसत आहेत. नेल आर्टमधील स्टॅम्प वापरून केला जाणारा प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो. तर नखांवर हँड पेटिंग करून केले जाणारे नेल आर्ट फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. स्टॅम्प आणि नेलपॉलिशच्या तुलनेत बारीक नक्षीकाम केलेले नेल आर्ट तुलनेने महाग असते. पण नखांवरील अशी कलाकुसर तितकीच सुंदर असते. याशिवाय नेल आर्ट केलेली खोटी नखेसुद्धा बाजारात आहेत. ती चिकटवूनही नखे झटपट सजवता येतात. चर्चमध्ये ‘कॅरल्स’ची धूनगुलाबी थंडीत वर्षभराच्या कामाचा शिणवटा घालवून नव्या उत्साहाने नाताळसाठी शहर व परिसरातील ख्रिस्ती बांधव सज्ज झाले असून, त्यासाठीची तयारी पूर्णत्वास येत आहे. शहरातील सर्व चर्च व घरोघरी आकर्षक रोशणाई करण्यात येत असून, त्याचबरोबर ‘कॅरल्स सिंंगिंग’नेही जोर धरला आहे. ‘कॅरल्स’ म्हणजे प्रभूचे आगमन जाहीर करणारी सुमधूर भक्तिगीते. नाताळच्या आधीच्या आठवड्यापासून (याला ‘आगमनकाळ’ म्हणतात) युवक-युवतींचे वाद्यवृंद संध्याकाळच्या वेळी कॅरल्स गात फिरतात. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रत्येक चर्चमध्ये प्रभूयज्ञ अर्पिला जातो. यालाच ‘मिडनाइट मास’ म्हणतात. हा या सणाचा धार्मिक विधी असतो. धार्मिक विधी संपल्यावर अगदी पहाटेपर्यंत ही कॅरल्स गायली जातात. या मंजुळ आणि मधुर गाण्यांच्या मोबदल्यात मुलांना टिप्स मिळते. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी आकाशातून गायन केले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कॅरल्स गायनाची प्रथा पाश्चिमात्यांकडून स्वीकारली आहे. सांताक्लॉज हा पाश्चिमात्य देशातील एक संत असल्याची आख्यायिका आहे. प्रत्येक देशाप्रमाणे त्याच्या संदर्भातल्या कथा बदलतात. पण सर्वश्रुत अशी एक कथा म्हणजे युरोपात ‘निकोलस’ नावाचा संत होता. हा संत एका गावातून दुसऱ्या गावात फिरायचा. गावातून जाताना तो गावातील मुलांना विविध गिफ्ट्स द्यायचा. संत निकोलस १८०७ मध्ये इटलीमधील पर्वतरांगांत खलाशांना भेटला होता. खलाशी त्याला घेऊन बारी येथे आले होते. संत निकोलसच्या आठवणींत लहान मुलांना ६ डिसेंबरला गिफ्ट्स दिली जायची. त्यानंतर बऱ्याच देशांत ही तारीख बदलून २४ आणि २५ डिसेंबर करण्यात आली. त्यावेळी संत निकोलसचा ‘सांताक्लॉज’ झाल्याचे म्हटले जाते. राजकीय व्यंगचित्रकार थॉमस नास्ट यांनी १९व्या शतकात ‘सांताक्लॉज’चे चित्र रेखाटले. हे चित्र रेखाटताना त्याच्यावर १८२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ए व्हिजिट फ्रॉम सेंट निकोलस’ या कवितेचा प्रभाव होता.‘सांताक्लॉज आला...’ असे म्हटले की, डोळ््यासमोर येतो पांढरा शुभ्र बर्फाच्छादित प्रदेश आणि त्यातून चालत येणारा लाल रंगाचे कपडे, टोपी घातलेला एक गुटगुटीत पांढऱ्या केसांचा, मिशा आणि मोठी दाढी असलेला हसतमुख सांताक्लॉज. सगळ््यांनाच सांताची क्रेझ असते. कारण त्याचा हसतमुख चेहरा, प्रेमळ डोळे आणि त्यांनी आणलेले गिफ्ट्स. आर्ट टुल्सना मागणी नेल आर्टची आवड लक्षात घेता अनेक ब्युटी सेंटरमध्ये नेल आर्टच्या साहित्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे खास नाताळसाठी लाल, हिरवा, गिल्टर्स शेड आणि रंगाच्या शेड्सच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय सजावटीसाठी लागणारे स्टोन आणि इतर साहित्यही घेतले जात आहे.