दुकान उघडण्यासाठी वेळेचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:46+5:302021-06-02T04:06:46+5:30
मुंबई : अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंची रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने दिवसाआड सुरू करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. पण मंगळवारी ...
मुंबई : अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंची रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने दिवसाआड सुरू करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. पण मंगळवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. राज्य सरकारच्या ब्रेक द चेन नियमावलीअंतर्गत मुंबई महापालिकेने १ जूनपासून अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली.
परिपत्रकानुसार रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी खुली राहणार आहेत. डाव्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार खुली राहणार आहेत. हा नियम आलटून पालटून लागू असणार आहे. त्याबाबतची यादी पालिकेच्या संबंधीत वार्डचे सहाय्यक आयुक्त देणार आहेत.
मंगळवारी दुकाने खुली करण्यास अल्प प्रतिसाद मिळाला.
सर्व ठिकाणी नियमावलींबाबत तक्रारी आल्या आहेत. नियमावलीचा गोंधळ आहे तर स्थानिक पोलिसांना माहिती नाही. या गोंधळामुळे मंगळवारी खूप कमी व्यवसाय झाला, अशी माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे विरेन शाह यांनी सांगितली. शाह म्हणाले की, राज्य सरकारने सकाळी ७ ते दुपारी २ याऐवजी सकाळी १० ते सायंकाळी ५ ही वेळ ठेवावी. तसेच पालिकेने दिवसाआडऐवजी रोज दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी.