डोंबिवली : देश विदेशातल्या विविध संस्कृती दर्शनाचे देखावे साकारण्याच्या शृंखलेत यावर्षी ‘शांतता’ आणि ‘बुद्ध संस्कृती’ या विषयावरील भव्य देखावा व त्या देखाव्यातून बुद्ध संस्कृतीचे प्रार्थना स्थळ अशी विशेष सजावट टिळकनगर गणोशोत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आले आहे. मंडळाचे यंदा 65 वे वर्ष असून मूळचे डोंबिवलीकर असलेल्या कलादिग्दर्शक संजय शशिकांत धबडे यांनी सलग सोळाव्या वर्षी ही सजावट केली आहे.
भगवान बुद्ध हे शांततेचे प्रतीक मानले जातात. सध्या ज्याप्रमाणो जगात अशांतता वाढलेली दिसते त्याच प्रमाणो माणसाच्या आयुष्यात पण ताण तणाव आणि चिंता वाढल्या आहेत. या सजावटीत भगवान बुद्धांच्या अनेकविध ‘योग मुद्रा’ दाखवल्या आहेत त्यातून मानवाला तणावमुक्त जीवन जगण्याचा संदेश देत आहेत. यामध्ये शेषशाही विष्णूप्रमाणो विश्रम करणारी भगवान बुद्धांची 13 फुटी मूर्ती तसेच सजावटीच्या प्रवेशद्वारावर असलेली असलेली भगवान बुद्धांची 13. 6 फुटाची आशीर्वाद देणारी मूर्ती पण गणोशभक्तांसह डोंबिवलीकरांमध्ये आकर्षणाचा विषय आहे .
या प्रार्थना स्थळातील भिंतींवरील नक्षीकाम देखील बुद्ध संस्कृतीची आठवण करुन देतात. ही सजावट
पाहण्यासाठी मंडळाच्या वतीने डोंबिवलीकरांसह भगवान बुद्धप्रेमींना आवाहन करण्यात आल्याचे प्रसिद्धी प्रमुख संदीप वैद्य यांनी सांगितले.
विविध स्पर्धासह वाचन छंद वाढण्यासाठी : उत्सव सत्रत 2 ते 7 सप्टेंबर या कालावधीत
नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तक प्रदर्शन , पोटाचे विकार आणि दुर्बिणीतून शस्त्रक्रिया या विषयावर व्याख्यान, विद्याथ्र्यासाठी आंतर शालेय प्रश्नमंजुषा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस पण 9क्क् तर बुद्धिबळ स्पर्धेस 12क् जणांचा उदंड सहभाग मिळाल्याचे वैद्य यांनी यावेळी सांगितले.