Join us

साखरचौथ गणरायाला निरोप

By admin | Published: September 13, 2014 10:36 PM

संगणकीय युगात धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच सामाजिक परंपरा कायम ठेवून पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळ वर्षभरात विविध कार्यक्र म राबवीत आहे.

नागोठणो : संगणकीय युगात धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच सामाजिक परंपरा कायम ठेवून पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळ वर्षभरात विविध कार्यक्र म राबवीत आहे. साखरचतुर्थीनिमित्त या मंडळाकडून सलग दहाव्यावर्षी गणोशोत्सव साजरा करून विविध उपक्रम राबविण्यात आले.             
पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळाकडून शिवराम शिंदे आणि अध्यक्ष हिराजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरचतुर्थीनिमित्त गणोशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस पाटील बबन शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करून या धार्मिक कार्यक्र माला सुरूवात झाली. दुपारी ज्योती मुरके ( मुंबई ) आणि वसंत भोईर (रोहा) यांच्यात नृत्याचा सामना रंगला. सायंकाळी बालगोपाळांचा हरिपाठ, रात्री शिवराम शिंदे, नागोठण्याचे माजी सरपंच लियाकत कडवेकर, हिराजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यानंतर पळस येथील महिलावर्गाचा पारंपरिक नृत्याचा बहारदार कार्यक्र म झाला. 
आज शनिवारी सकाळी लहान मुलांचा मनोरंजनाचा कार्यक्र म घेण्यात आला. दुपारी अंबा नदीच्या निडी पुलानिजक गणोशमूर्तीचा विसर्जन सोहळा झाला. या धार्मिक सोहळ्यादरम्यान कॉंग्रेसचे युवा नेते वैकुंठ पाटील, माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, मयुर दिवेकर, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष सिराज पानसरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर, कुणबी समाजाचे नेते दत्ता झोलगे, मधुकर ठमके, ह. भ.प. दळवी गुरु जी, दिनाभाऊ जांबेकर, भाजपाचे नेते किशोर म्हात्रे आदी मान्यवरांसह पंचक्र ोशीतील नागरिकांनी याठिकाणी भेट देवून गणपतीचे दर्शन घेतले. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे अध्यक्ष हिराजी शिंदे, उत्सव समिती अध्यक्ष परेश विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर शिर्के, मारु ती शिर्के, मोरेश्वर भालेकर, हिराजी शेलार, चंद्रकांत भालेकर, महादेव शिंदे, राकेश शिंदे, मनोज शिंदे, योगेश विचारे, परशुराम शिर्के, नरेश भालेकर, विजय विचारे, नामदेव शिंदे, विशाल शिंदे, जतीन विचारे आदी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)
 
कर्जत - भाद्रपद संकष्टी चतुर्थीला कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे परिसरातील युवकांनी नानामास्तर नगरमध्ये ‘मुद्रे गावाचा राजा’ गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. दररोज संगीत भजनांची पर्वणी मिळत असून अनेक करमणुकीचे कार्यक्र म होत आहेत. अडीच दिवस असलेल्या या उत्सवास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या परिसरातील युवकांनी एकत्न येऊन साखर चतुर्थी गणोशोत्सव स्थापन करून गेल्या वर्षापासून गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभारंभ केला. नेहमीच्या गणोशोत्सवात प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन होत असते. त्यामुळे अनंत चतुर्दशी नंतर येणा:या संकष्टी चतुर्थीला सार्वजनिक गणोशोत्सवाची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरले.  साखर चौथेचा मुद्रे गावचा राजा या गणरायाची प्राणप्रतिष्ठा कर्जतचे पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील यांच्या हस्ते गणोश पूजन करण्यात आले. या प्रसंगी निलेश महाडिक, भानुदास पालकर, प्रदीप वायकर, भगवान शिंदे, अमोल मांडे, बाळू वायकर, सोमनाथ पालकर, दीपक मोधळे, विनोद सोनावळे, सुमित बैलमारे आदी उपस्थित होते.