थेट प्रिस्क्रीप्शनवर व्होट फॉर हेल्दी नेशनचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:58 AM2019-04-22T02:58:34+5:302019-04-22T02:58:45+5:30
मतदानाच्या जनजागृतीसाठी डॉक्टरचा पुढाकार
मुंबई : मतदान हा प्रत्येक सुजाण भारतीय नागरीकाचा मुलभूत अधिकार व कर्तव्य आहे. बऱ्याचदा आपल्या एका मताने काय फरक पडणार असा समज करून मतदान प्रक्रियेपासून अनेक जण दूर राहतात. पंरतू तुमचे एक मतही तितकेच बहुमूल्य आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने हा अधिकार बजावणे गरजेचे आहे, म्हणूनच चेंबूर येथील खासगी रूग्णालयातर्फे मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत डॉक्टर, परिचारिका आणि रूग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन करणार आहे.
या मोहिमेस सुरूवात झाली असून ‘सुदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा’ हा संदेश प्रिस्क्रीप्शनवर लिहत प्रत्येक घराघरात हा संदेश पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदानाचे महत्व विशद करणारे संदेश, डॉक्टरांचे मतदानाविषयी आवाहन करणारे व्हिडीओ जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, रूग्णालयाच्या रूग्ण बाह्य विभागात एका केंद्राच्या माध्यमातून रूग्णालयातील कर्मचारी स्वंयसेवक बनून मतदानाच महत्व नागरिक, रूग्णांना विशद करतील.
या मोहिमेविषयी बोलताना डॉ. रॉय पाटणकर म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात मोठे लोकशाही असणारा देश आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला जो अधिकार मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. आपला अधिकार बजावून मतदानाचा टक्का वाढविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून तुम्हाला अपेक्षित असलेला बदल घडविण्यासाठी तसेच देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. जसे रूग्णाला औषधोपचार आवश्यक आहे तसेच लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.
तुम्हाला अपेक्षित बदल घडविण्यासाठी...
भारत ही जगातील सर्वात मोठे लोकशाही असणारा देश आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला जो अधिकार मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. आपला अधिकार बजावून मतदानाचा टक्का वाढविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून तुम्हाला अपेक्षित असलेला बदल घडविण्यासाठी तसेच देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे.