Join us

सोमवारी पहाटे उल्कावर्षाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 6:44 AM

येत्या सोमवारी २२ एप्रिल रोजी पहाटे ईशान्य क्षितिजावर स्वरमंडळ तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव खगोलप्रेमींना अभिजित तारकेजवळ पाहायला मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

मुंबई : येत्या सोमवारी २२ एप्रिल रोजी पहाटे ईशान्य क्षितिजावर स्वरमंडळ तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव खगोलप्रेमींना अभिजित तारकेजवळ पाहायला मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.याविषयी सोमण म्हणाले, हा उल्कावर्षाव ‘लिराइडस उल्कावर्षाव’ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी पृथ्वी सी/ १८६१ थॅचर या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. ५ एप्रिल १८६१ रोजी या धूमकेतूचा शोध थॅचर यांनी लावला. हा धूमकेतू दर ४१५ वर्षांनी सूर्याला भेट देत असतो. दरवर्षी २२ एप्रिलला हा उल्कावर्षाव पाहायला मिळतो. तासाला १० ते १२ उल्का सेकंदास ४८ किलोमीटर या वेगाने पडत असतात.