मुंबई - ‘सुपरमून’नंतर अवघ्या दोनच दिवसांत अवकाशात उल्कावर्षाव होणार आहे. नववर्षातील हा पहिला उल्कावर्षाव आहे. गुरुवार, ४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजल्यापासून हा उल्कावर्षाव होईल. ईशान्य दिशेस स्वाती नक्षत्राच्या डाव्या बाजूला भूतप तारका संघातून उल्कावर्षाव होताना दिसेल, असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.सोमण म्हणाले की, उल्कावर्षावादरम्यान साधारणत: ताशी ४०पेक्षा जास्त उल्का पडताना दिसतात. मात्र, या वेळी उल्का दर्शनात चंद्रप्रकाशाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. अवकाशातील धूलिपाषाण गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे झेपावतात, त्या वेळी वातावरणाशी होणाºया घर्षणामुळे जळून जातात. त्या वेळी प्रकाशित रेषा दिसते. त्याला ‘उल्का’ असे म्हणतात. उल्कांचे दर्शन साध्या डोळ्यांनी होते. शहरातील दिव्यांच्या प्रकाशाचा अडथळा येतो. शहरांपासून दूर गेल्यास उल्कावर्षाव चांगला दिसू शकतो.
उद्या पहाटे होणार उल्कावर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 5:19 AM