Join us

महाराष्ट्रातील 'या' भागात अतिवृष्टी होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 7:02 PM

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याचे दिसून आले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह इतर जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याचे दिसून आले आहे. मात्र हवामान खात्याने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नागपूर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागात सप्टेंबरच्या सुरुवातीलाच मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 2 सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होणार असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचप्रमाणे अनेक जनावरे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले होते. शेती देखील पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. 

टॅग्स :पाऊसमुंबईमहाराष्ट्रसांगली पूर