Join us

एक लाख वीस हजार रिक्षाचे मीटर अद्यावतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकतीच टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी ...

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकतीच टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून करण्यात येत आहे. मुंबईत आतापर्यंत एक लाख वीस हजार रिक्षा मीटरचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. तर सात हजार टॅक्सीचे मीटर अद्यावतीकरण झाले आहे.

मुंबईत दोन ते अडीच लाख रिक्षा आणि वीस ते पंचवीस हजार टॅक्सी आहेत. मीटर अद्ययावत करण्यासाठी प्रत्येकी ७०० रुपयांचा खर्च येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सींसाठी मीटर अद्ययावत करण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्येक आठवड्याला एका क्रमांकाचे वाहन केले जात आहे. त्यासाठी मे पर्यंत मुदत देण्यात आली होती, पण ही मुदत जून ते ऑगस्टपर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे.

रिक्षा टॅक्सी संघटनेच्या एका नेत्याने सांगितले की, जवळपास एक लाख दहा हजार रिक्षा आणि १३ हजार टॅक्सीचे मीटर अद्यावतीकरण बाकी आहे.