मिथेनॉल चोरून विकणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2015 01:44 AM2015-08-06T01:44:34+5:302015-08-06T01:44:34+5:30

मालवणी दारूकांडातील मुख्य आरोपी भरतभाई पटेल (४२) याच्या मुसक्या गुन्हे शाखेने अखेर आवळल्या. आरोपी भरतला गुन्हे शाखेच्या पथकाने काल अहमदाबादेतून ताब्यात घेतले.

Methanol Thief | मिथेनॉल चोरून विकणारा गजाआड

मिथेनॉल चोरून विकणारा गजाआड

Next

मुंबई : मालवणी दारूकांडातील मुख्य आरोपी भरतभाई पटेल (४२) याच्या मुसक्या गुन्हे शाखेने अखेर आवळल्या. आरोपी भरतला गुन्हे शाखेच्या पथकाने काल अहमदाबादेतून ताब्यात घेतले.
मालवणीत मिथेनॉल हे अत्यंत जहरी औद्योगिक रसायन पुरवणाऱ्यांच्या साखळीतला भरत मुख्य आरोपी असल्याचा दावा गुन्हे शाखेने करते. गावठीऐवजी मिथेनॉल मिसळलेले पाणी पिऊन मालवणीत १००हून अधिक तळीरामांचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेने तपास हाती घेत आतापर्यंत १३ जणांना गजाआड केले होते. त्यात गुत्तेचालकांपासून मिथेनॉल पुरवणाऱ्यांचा समावेश आहे. भरत हा मूळचा अहमदाबादचा. तो मिथेनॉलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना हाताशी धरून हे रसायन चोरायचा.
पुढे मिथेनॉल विकत घेणारे शोधून त्यांना विकायचा. याच उद्योगातून तो गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुल लतिफ ऊर्फ अतिक या मुख्य आरोपीच्या संपर्कात होता. भरत अतिकला मिथेनॉल पुरवत असे. भरतच्या अटकेने मालवणी दारूकांडाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या १४वर पोहोचली आहे.

Web Title: Methanol Thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.