Join us

मिथेनॉल चोरून विकणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2015 1:44 AM

मालवणी दारूकांडातील मुख्य आरोपी भरतभाई पटेल (४२) याच्या मुसक्या गुन्हे शाखेने अखेर आवळल्या. आरोपी भरतला गुन्हे शाखेच्या पथकाने काल अहमदाबादेतून ताब्यात घेतले.

मुंबई : मालवणी दारूकांडातील मुख्य आरोपी भरतभाई पटेल (४२) याच्या मुसक्या गुन्हे शाखेने अखेर आवळल्या. आरोपी भरतला गुन्हे शाखेच्या पथकाने काल अहमदाबादेतून ताब्यात घेतले. मालवणीत मिथेनॉल हे अत्यंत जहरी औद्योगिक रसायन पुरवणाऱ्यांच्या साखळीतला भरत मुख्य आरोपी असल्याचा दावा गुन्हे शाखेने करते. गावठीऐवजी मिथेनॉल मिसळलेले पाणी पिऊन मालवणीत १००हून अधिक तळीरामांचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेने तपास हाती घेत आतापर्यंत १३ जणांना गजाआड केले होते. त्यात गुत्तेचालकांपासून मिथेनॉल पुरवणाऱ्यांचा समावेश आहे. भरत हा मूळचा अहमदाबादचा. तो मिथेनॉलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना हाताशी धरून हे रसायन चोरायचा. पुढे मिथेनॉल विकत घेणारे शोधून त्यांना विकायचा. याच उद्योगातून तो गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुल लतिफ ऊर्फ अतिक या मुख्य आरोपीच्या संपर्कात होता. भरत अतिकला मिथेनॉल पुरवत असे. भरतच्या अटकेने मालवणी दारूकांडाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या १४वर पोहोचली आहे.