मुंबई : ओशिवरा पोलीस, राज्य महिला आयोगापाठोपाठ अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सिने अँड टीव्ही आर्टीस्ट असोसिएशन (सिंटा) यांच्याकडे आपले म्हणणे मांडले आहे. याबाबतचे पत्र तिने सिंटाला दिल्याचे तिच्या वकिलाने सांगितले.तनुश्रीने २००८ साली हॉर्न ओके प्लिज च्या सेटवर तिच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांनी अश्लिल व्यवहार केला. तर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग तसेच निमार्ता सामी सिध्दीकी यांनी त्यांना साथ दिली असे म्हटले होते. याप्रकरणी त्या चौघांनी सिंटाकडे चुकीची माहिती देत त्यांची दिशाभुल केल्याचे तनुश्रीचे म्हणणे होते. त्यानुसार ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तनुश्रीच्या वकिलांनी सिंटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना एक लेखी पत्र दिले. या पत्रात तनुश्रीसोबत २००८ साली नेमके काय घडले याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सिंटाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आमच्याकडे एका लेखी पत्राची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही एक पत्र त्यांना दिले आहे, अशी माहिती तनुश्रीचे वकिल नितीन सातपुते यांनी दिली.
#Metoo : तनुश्री दत्ताने दिले सिने आर्टीस्ट असोसिएशनला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 2:51 AM