Join us

#MeToo: मकरंद अनासपुरे यांनी केली नाना पाटेकर यांची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 4:54 AM

तनुश्रीने दहा वर्षांनंतर पुन्हा तेच आरोप नानांवर करणे चुकीचे आहे. तिच्या आरोपामागचा ‘बोलवता धनी’ कोण आहे हे शोधलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

मुंबई : तनुश्रीने दहा वर्षांनंतर पुन्हा तेच आरोप नानांवर करणे चुकीचे आहे. तिच्या आरोपामागचा ‘बोलवता धनी’ कोण आहे हे शोधलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याकडे समंजसपणे आणि संयमाने पाहिले पाहिजे, सत्य सर्वांना ठाऊक आहे पण ते योग्य पद्धतीने लोकांपर्यंत येणे गरजेचे आहे, त्यामुळे मी ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी’ नानांसोबत आहे, अशा शब्दात मकरंद यांनी नाना पाटेकर यांची पाठराखण केली आहे. ‘मी टू’ प्रकरणात मी नाना पाटेकर यांच्या पाठी उभा आहे. नाना गेली पाच दशके या क्षेत्रात काम करत आहे. त्यांच्यावर कोणीही बोट दाखवले नाही, त्यांचा स्वभाव रागीट आहे हे मी मान्य करतो. बऱ्याचदा आम्हालाही ते रागवितात. पण त्यालाही कारणे असतात.नाना पाटेकर यांनी चित्रपटसृष्टीसाठीचे नाही तर देशासाठीही मोलाचे योगदान दिले आहे, त्यामुळे त्यांच्यापाठी मी सदैव उभे राहणार, असे मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. १० वर्षांनंतर पुन्हा हे प्रकरण पुढे यायचे कारण काय? शिवाय, याविषयी माध्यमांमध्ये दीर्घ चर्चा केल्यानंतर पोलीस, न्यायव्यवस्थेत दाद मागायला ती गेली या सर्व गोष्टींमुळे तिच्या हेतूविषयी शंका निर्माण होत आहे. याचा संदर्भ तनुश्रीला अमेरिकन ग्रीन कार्ड मिळाल्याशी आहे का, असा सवालही मकरंद यांनी उपस्थित केला आहे.करिअर संपलेल्या महिलाच ‘मी-टू’चा आधार घेताहेतसोलापूर : इंडस्ट्रीजमधील ज्यांचं बँक बॅलन्स संपलेलं आहे, ज्यांचं करिअर संपलेलं आहे आणि पुन्हा नव्याने करिअर घडविण्यासाठी त्या ‘मी-टू’चा आधार घेताहेत. तनुश्री दत्ताने केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत अभिनेत्री राखी सावंत हिने ‘नाना, आय एम आॅलवेज विथ् यू’ असे म्हणत नाना पाटेकरांची पाठराखण केली.

टॅग्स :मीटू