#MeToo : पूजा मिश्राचा सलमान खानवर लैंगिक छळाचा आरोप; सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 02:45 AM2018-10-12T02:45:48+5:302018-10-12T04:10:04+5:30

सध्या ‘मीटू’चे सोशल वादळ घोंघावत आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. या यादीत आता सलमान खानच्या नावाचीही नोंद झाली आहे. मॉडेल आणि ‘बिग बॉस’ची पूर्व स्पर्धक पूजा मिश्राने सलमान खानने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

#MeToo: Pooja Mishra's accusation of sexual harassment over Salman Khan; Video placed on social media | #MeToo : पूजा मिश्राचा सलमान खानवर लैंगिक छळाचा आरोप; सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

#MeToo : पूजा मिश्राचा सलमान खानवर लैंगिक छळाचा आरोप; सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ

googlenewsNext

मुंबई : सध्या ‘मीटू’चे सोशल वादळ घोंघावत आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. या यादीत आता सलमान खानच्या नावाचीही नोंद झाली आहे. मॉडेल आणि ‘बिग बॉस’ची पूर्व स्पर्धक पूजा मिश्राने सलमान खानने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
सलमानवर लैंगिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या पूजा मिश्राने यापूर्वी २०१६ मध्येही एक फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने सलमान आणि त्याचे कुटुंबीय, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केले होते. या सर्वांनी दिल्लीत ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याआधी पूजा मिश्राने अभिनेत्री ईशा कोप्पिकरचा नवरा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याविरोधात बलात्काराचा कट रचल्याचा आरोप केला होता.

‘त्या’ पोलिसाचीही चौकशी
‘दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर तनुश्रीसोबत झालेल्या अश्लील कृत्याची तक्रार करण्यासाठी ती गोरेगाव पोलीस ठाण्यात गेली होती. सर्व प्रकार ऐकल्यानंतर नानांच्या नावाचा यात उल्लेख करायचा का, असा सवाल तिला तेथे हजर असलेल्या पोलीस अधिकाºयाने विचारल्याचे तिचे म्हणणे आहे. नानांचे नाव घातले तर तुमचेही नाव त्यात येणार, कारण तुमच्याविरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद त्यांच्याकडून करण्यात येत आहे, असे सांगत तिला घाबरवण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे. परिणामी, तत्कालीन संबंधित पोलिसाचीही चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याच कारणास्तव हे प्रकरण गोरेगाव पोलीस ठाण्यात वर्ग न केल्याचीदेखील चर्चा आहे.

कोणत्याही अभिनेत्रीने हृतिक रोशनसोबत काम करूनये - कंगना
मीटू’च्या या आरोपांच्या फैरीत अभिनेत्री कंगना राणावतनेही उडी घेतली आहे. हृतिक रोशनविरोधात तिने प्रसिद्धिमाध्यमांसमोर पुन्हा एकदा आघाडी उघडली आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार, जे लोक आपल्या पत्नीला घेऊन मिरवतात आणि प्रेयसीला लपवून ठेवतात त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. हा टोला हृतिकसाठी होता का? असे विचारले असता, हो! मी हृतिकबद्दलच बोलत असल्याचे तिने सांगितले. लोकांनी त्याच्यासोबत काम करणे बंद केले पाहिजे, असे कंगनाने म्हटले आहे.

तनुश्रीसाठी काँग्रेसचा मोर्चा
तनुश्रीला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अजंता यादव यांच्या नेतृत्वाखाली ओशिवरा पोलीस ठाण्याबाहेर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. तनुश्रीवर कामाच्या जागी चित्रीकरणादरम्यान जो अत्याचार झाला, त्याबाबत तिने दहा वर्षांनंतर तक्रार दाखल केली. इतकी वर्षे ती या यातना सहन करत होती. आम्ही ओशिवराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर आणि महिला आयोगाच्या प्रमुख विजया रहाटकर यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना पत्र देत एकच विनंती केली आहे की, दहा वर्षांनंतर तुम्ही जर तनुश्री प्रकरणात चौकशी करत आहात तर ती योग्य प्रकारे करावी. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाºया लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी एक कमिटी नेमावी, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

आलोकनाथवर आणखी एका अभिनेत्रीचा आरोप
‘सोनू के टिटू की स्वीटी’ या सिनेमातील अभिनेत्री दीपिका अमिन यांनी आलोकनाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. ‘इंडस्ट्रीमध्ये अनेकांनाच हे माहीत आहे की आलोकनाथ हा एक दारूड्या असून तो महिलांचे शोषण करतो.
काही वर्षांपूर्वी एका टेलिफिल्मसाठी आम्ही आउटडोअर शूटिंगला गेलो होतो. तेव्हा त्यांनी जबरदस्तीने माझ्या रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. ते अत्यंत स्त्रीलंपट स्वभावाचे असून दारू पिऊन तमाशा करतात. मी सुरक्षित राहावी यासाठी पूर्ण टीम सतत माझ्यासोबत राहायची,’ असे टिष्ट्वट दीपिका यांनी केले आहे.

आलोकनाथ यांचे ‘हे’ रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळले होते - रेणुका शहाणे
अभिनेत्री रेणुका शहाणेने आलोकनाथ यांच्यासोबत ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात काम केले होते. तसेच ‘इम्तिहान’ या मालिकेतही रेणुकाने आलोकनाथ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.
आलोकनाथ यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांनंतर रेणुकाने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, माझे भाग्य चांगले होते की माझे कधीच त्यांच्यासोबत आउटडोअर शूट नव्हते. माझा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.
पण त्यांची दोन रूपे आहेत असे मी आधीच ऐकले होते. दारू प्यायल्यानंतर त्यांना भान नसते असे मी ऐकून होते. दीपिका देशपांडे या अभिनेत्रीने मला त्यांच्या या दोन रूपांविषयी नव्वदच्या दशकातच सांगितले होते. तसेच ते तरुण मुलींशी पार्टीत दारू पिऊन वाईट वागतात असे मला काहींनी सांगितले होते. आता आलोकनाथ यांच्यावर सगळ्यांनी केलेल्या आरोपानंतर मला चांगलाच धक्का बसला

‘मीटू’ निव्वळ बकवास
‘मीटू’अंतर्गत आलोकनाथ, नाना पाटेकर, विकास बहल, रजत कपूर अशा अनेकांकडे संशयाच्या नजरा रोखल्या गेल्या असतानाच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र प्रसिद्धिमाध्यमांसमोर बोलताना वेगळेच मत मांडले आहे.
‘होय, मीटू निव्वळ बकवास आहे. त्याकडे गंभीरपणे घेण्यासारखे कारण नाही,’ असे असरानी यांनी म्हटले आहे. ‘माझा महिलांना पाठिंबा आहे. पण ही मीटू मोहीम प्रसिद्धी लाटण्याचा, फिल्म प्रमोशनचा एक भाग आहे. मुळात ही मोहीमच निरर्थक आहे. त्यामुळे तिला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. यामुळे केवळ आणि केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीचे नुकसान होते,’ असेही ते म्हणाले.

चौघांवर अटकेची कारवाई करण्याची मागणी
सामान्य माणसाकडून असा प्रकार घडल्यास त्यावर तत्काळ कारवाई केली जाते. मग तनुश्रीच्या प्रकरणात निव्वळ मोठी व्यक्ती आणि राजकारण्यांच्या दबावामुळे पोलीस संशयितांना पाठीशी घालत आहेत का, असा सवाल अ‍ॅड. सातपुते यांनी उपस्थित केला असून पोलिसांनी अटकेची कारवाई लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: #MeToo: Pooja Mishra's accusation of sexual harassment over Salman Khan; Video placed on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.