#MeToo: आरोपांची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:49 AM2018-10-25T05:49:30+5:302018-10-25T05:49:53+5:30

‘मी टू’ मोहिमेत दररोज नवनवीन आरोपांची भर पडत आहे. हिंदी मालिकांतील अभिनेत्री सोनाली वेंगुर्लेकरने कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत.

#MeToo: Start a series of allegations | #MeToo: आरोपांची मालिका सुरूच

#MeToo: आरोपांची मालिका सुरूच

googlenewsNext

मुंबई : ‘मी टू’ मोहिमेत दररोज नवनवीन आरोपांची भर पडत आहे. हिंदी मालिकांतील अभिनेत्री सोनाली वेंगुर्लेकरने कास्टिंग डायरेक्टर राजा बजाजवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंतने पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताने आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगत खळबळ उडवली आहे. अभिनेत्री अलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदाननेही करिअरच्या सुरुवातीला आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे वक्तव्य केले आहे.
सोनाली वेंगुर्लेकरने आपला धक्कादायक अनुभव कथन केला आहे. एका शूटिंगला लोणावळ्याला गेले असताना राजा बजाज यांनी काही मॉडेलचे कपडे आपल्यास परिधान करायला लावून स्टार व्हायचे असेल तर विवस्त्र हो, असे त्यांनी सांगितले. तसेच माझे कपडे काढण्याचाही प्रयत्न केला. मी कशीबशी स्वत:ला वाचविण्यास खोलीबाहेर पळाले, असे सोनालीने म्हटले आहे.
अलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनीही आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने त्यांचा त्यातून बचाव झाला. सोनी राजदान म्हणाल्या, या घटनेबद्दल मी कधीही कुणाजवळही बोलले नाही. कारण त्या व्यक्तीचे कुटुंब मला उद्ध्वस्त करायचे नव्हते. मी शांत बसले नसते तर त्याच्या कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबाला भोगावी लागली असती. म्हणून मी शांत बसले़ कदाचित तो काळ वेगळा होता. आजच्या घडीला अशी घटना घडली असती तर मी नक्की आवाज उठवला असता, असे सोनी राजदान म्हणाल्या.

Web Title: #MeToo: Start a series of allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.