मेट्रो २ अ : पोईसर नदी येथे बसला ७५ मीटरचा स्टील स्पॅन (फोटो मेल)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:13 AM2021-01-08T04:13:18+5:302021-01-08T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. या कामाचा एक भाग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. या कामाचा एक भाग म्हणून मेट्रो २ अ च्या मार्गावर पोईसर नदी येथे ७५ मीटरचा स्टील स्पॅन बसविण्यात आला आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. मेट्रोची कामे करताना जेथे सामान्य काँक्रिट स्ट्रक्चर तयार करणे शक्य नसते किंवा अवघड असते, अशा ठिकाणी स्टील स्पॅनचा वापर केला जातो.
‘मुंबई इन मिनिट्स’चे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वेगाने काम करीत आहे. नुकतेच मेट्रो-२ अ वर ५८.८६ टन वजनाचे एक स्टील गर्डर उभारण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रो २ अ च्या मार्गावर पोईसर नदी येथे ७५ मीटरचा स्टील स्पॅन बसविण्यात आला. मेट्रो-२ अ डिसेंबर २०२०पर्यंत सुरू करण्याचा विचार होता. मात्र अडचणींमुळे यास विलंब होत आहे. दहिसर ते डी.एन. नगर असा मेट्रो २ अ चा मार्ग असून, हे अंतर १८ किमी आहे. हा मार्ग उन्नत असून, यात १७ स्थानके आहेत. या मार्गाचा फायदा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे, मेट्रो लाइन १, मेट्रो लाइन २ ब आणि अंधेरी ते दहिसरला होईल. शिवाय मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई जोडली जाईल. प्रवासाची वेळ ५० टक्के वाचेल.