मेट्रो-२ ब, मेट्रो-४ सुसाट, कंत्राटदारांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 07:22 AM2018-03-06T07:22:05+5:302018-03-06T07:22:05+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ या दोन मार्गिकांच्या उन्नत मार्गाच्या आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ या दोन मार्गिकांच्या उन्नत मार्गाच्या आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी यासंदर्भात सांगितले की, मुंबई आणि महानगर प्रदेशाला मेट्रोची असणारी गरज संपूर्ण मेट्रो मार्गिकांकरिता करण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या नियुक्तीवरूनच अधोरेखित होते. दळणवळण, सोपे दळणवळण हे शहराच्या विकासाची किल्ली आहे. प्रवाशांना सहज, जलद आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत.
त्याशिवाय प्रवाशांना कुठूनही-कोठेही एका तासात पोहोचता यावे, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मेट्रो-२ब मार्गिकेच्या पॅकेज-६करिता एम.बी. झेड आणि आरसीसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचसोबत पॅकेज-७चा उन्नत मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता जीजीवायएचबीसीएल, नीरज सिमेंट स्ट्रक्चरल आणि एमपीकेएचएस यांची नियुक्ती करण्यात आली
आहे.
ठाणे-बेलापूर रस्त्यालाही मान्यता
मेट्रो-२बच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देतानाच कार्यकारी समितीने
ठाणे-बेलापूर रस्त्याला मान्यता दिली आहे. याचा खर्च २३७ कोटी आहे. यामध्ये १.७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. शिवाय समितीने ठाण्यातील कोपरी येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरिता १२५ कोटी, छेडानगर उड्डाणपुलाच्या विकासाकरिता २२३ कोटी, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील मुर्धा गाव ते उत्तन गाव रस्त्याच्या विकासाकरिता ६१ कोटी, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील घोडबंदरपासून ते जैसल पार्क या २ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासाकरिता ५५ कोटींस मान्यता दिली आहे.
मेट्रो - ४ मार्गिकेच्या उन्नत मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता कार्यकारी समितीमध्ये कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पॅकेज-८करिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि एएसटीएएलडीआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पॅकेज-९साठी टाटा प्रोजेक्ट, चायना हार्बर इंजिनीअरिंग, पॅकेज-१०करिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एएसटीएएलडीआय.
पॅकेज-११करिता टाटा प्रोजेक्ट, चायना हार्बर इंजिनीअरिंग,
पॅकेज-१२करिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एएसटीएएलडीआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पॅकेज ६
सहा स्थानके
खर्च
521 कोटी
एमटीएनएल मेट्रो
एस.जी. बर्वे मार्ग
कुर्ला टर्मिनस
कुर्ला पूर्व द्रुतगती महामार्ग
चेंबूर
पॅकेज ७
पाच स्थानके
खर्च
393 कोटी
डायमंड गार्डन
शिवाजी चौक
बीएसएनएल मेट्रो
मानखुर्द
मंडाले
पॅकेज ८
सहा स्थानके
खर्च
540कोटी
भक्ती पार्क
वडाळा टी.टी.
आणिक नगर बस डेपो
सुमन नगर
सिद्धार्थ नगर
सिद्धार्थ कॉलनी
अमर महल जंक्शन
पॅकेज ९
सात स्थानके
खर्च
532कोटी
गरोडिया नगर
पंत नगर
लक्ष्मी नगर
श्रेयस सिनेमा
गोदरेज कंपनी
विक्रोळी मेट्रो
सूर्या नगर
पॅकेज १0
सहा स्थानके
गांधी नगर
नेवल हाउसिंग
भांडुप महापालिका
भांडुप मेट्रो
शांघ्रीला
सोनापूर
पॅकेज ११
सात स्थानके
खर्च
513कोटी
मुलुंड फायर स्टेशन
मुलुंड नाका
तीनहात नाका
आरटीओ ठाणे
महापालिका मार्ग
कॅडबरी जंक्शन
माजिवाडा
पॅकेज १२
सहा स्थानके
कापूरबावडी
मानपाडा
टिकुजिनी वाडी
डोंगरीपाडा
विजय गार्डन
कासारवडवली