Join us

मेट्रो-२ ब, मेट्रो-४ सुसाट, कंत्राटदारांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:22 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ या दोन मार्गिकांच्या उन्नत मार्गाच्या आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई  - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ या दोन मार्गिकांच्या उन्नत मार्गाच्या आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी यासंदर्भात सांगितले की, मुंबई आणि महानगर प्रदेशाला मेट्रोची असणारी गरज संपूर्ण मेट्रो मार्गिकांकरिता करण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या नियुक्तीवरूनच अधोरेखित होते. दळणवळण, सोपे दळणवळण हे शहराच्या विकासाची किल्ली आहे. प्रवाशांना सहज, जलद आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत.त्याशिवाय प्रवाशांना कुठूनही-कोठेही एका तासात पोहोचता यावे, अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मेट्रो-२ब मार्गिकेच्या पॅकेज-६करिता एम.बी. झेड आणि आरसीसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचसोबत पॅकेज-७चा उन्नत मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता जीजीवायएचबीसीएल, नीरज सिमेंट स्ट्रक्चरल आणि एमपीकेएचएस यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.ठाणे-बेलापूर रस्त्यालाही मान्यतामेट्रो-२बच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देतानाच कार्यकारी समितीनेठाणे-बेलापूर रस्त्याला मान्यता दिली आहे. याचा खर्च २३७ कोटी आहे. यामध्ये १.७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. शिवाय समितीने ठाण्यातील कोपरी येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरिता १२५ कोटी, छेडानगर उड्डाणपुलाच्या विकासाकरिता २२३ कोटी, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील मुर्धा गाव ते उत्तन गाव रस्त्याच्या विकासाकरिता ६१ कोटी, मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील घोडबंदरपासून ते जैसल पार्क या २ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासाकरिता ५५ कोटींस मान्यता दिली आहे.मेट्रो - ४ मार्गिकेच्या उन्नत मार्ग आणि स्थानकांच्या बांधकामाकरिता कार्यकारी समितीमध्ये कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.पॅकेज-८करिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि एएसटीएएलडीआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पॅकेज-९साठी टाटा प्रोजेक्ट, चायना हार्बर इंजिनीअरिंग, पॅकेज-१०करिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एएसटीएएलडीआय.पॅकेज-११करिता टाटा प्रोजेक्ट, चायना हार्बर इंजिनीअरिंग,पॅकेज-१२करिता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एएसटीएएलडीआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पॅकेज ६सहा स्थानकेखर्च521 कोटीएमटीएनएल मेट्रोएस.जी. बर्वे मार्गकुर्ला टर्मिनसकुर्ला पूर्व द्रुतगती महामार्गचेंबूरपॅकेज ७पाच स्थानकेखर्च393 कोटीडायमंड गार्डनशिवाजी चौकबीएसएनएल मेट्रोमानखुर्दमंडालेपॅकेज ८सहा स्थानकेखर्च540कोटीभक्ती पार्कवडाळा टी.टी.आणिक नगर बस डेपोसुमन नगरसिद्धार्थ नगरसिद्धार्थ कॉलनीअमर महल जंक्शनपॅकेज ९सात स्थानकेखर्च532कोटीगरोडिया नगरपंत नगरलक्ष्मी नगरश्रेयस सिनेमागोदरेज कंपनीविक्रोळी मेट्रोसूर्या नगरपॅकेज १0सहा स्थानकेगांधी नगरनेवल हाउसिंगभांडुप महापालिकाभांडुप मेट्रोशांघ्रीलासोनापूरपॅकेज ११सात स्थानकेखर्च513कोटीमुलुंड फायर स्टेशनमुलुंड नाकातीनहात नाकाआरटीओ ठाणेमहापालिका मार्गकॅडबरी जंक्शनमाजिवाडापॅकेज १२सहा स्थानकेकापूरबावडीमानपाडाटिकुजिनी वाडीडोंगरीपाडाविजय गार्डनकासारवडवली 

टॅग्स :मुंबईमेट्रो