मेट्रो ३ : मुंबईच्या पोटात २ किमीचे भुयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:44 AM2018-05-08T05:44:01+5:302018-05-08T05:44:01+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ ६ महिन्यांत २ हजार १९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.

 Metro 3: 2km of Tunnel under Mumbai | मेट्रो ३ : मुंबईच्या पोटात २ किमीचे भुयार

मेट्रो ३ : मुंबईच्या पोटात २ किमीचे भुयार

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ ६ महिन्यांत २ हजार १९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. ३३.५ किमी लांबी असलेल्या या पूर्ण प्रकल्पाच्या भुयारीकरणाकरिता प्राधिकरणाला १७ टनेल बोअरिंग मशिन्सची आवश्यकता आहे. त्यापैकी ११ मशिन्स शहरात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत ८ मशिन्सद्वारे भुयारीकरणाचे काम करण्यात येत आहे. या मशिन्सला सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा या नद्यांची नावे देण्यात आली आहेत.
आझाद मैदान या पॅकेज-२मधील वैतरणा १ व २ टीबीएम्सद्वारे ग्रँटरोडपर्यंत ४.५ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी ४५० मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. नयानगर या पॅकेज-४ अंतर्गत कृष्णा १ व २ या टीबीएम्सद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत २.५ किमी भुयारीकरण करण्यात येणार असून, त्यापैकी १००५ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. विद्यानगरी या पॅकेज ५ अंतर्गत गोदावरी १ व २ या मशिन्सद्वारे आंतरदेशीय विमानतळ स्थानकापर्यंत २.९८ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे.

कामाला गती येणार...
८ टीबीएमद्वारे २ हजार मीटरपेक्षा अधिक भुयारीकरण पूर्ण केले आहे. १५ टीबीएम्सचे कारखाना स्वीकृती परीक्षण पूर्ण झाले असून, प्रकल्पाला आवश्यक असणाºया १७ ही टीबीएम्स जुलैअखेर दाखल होऊन सर्व पॅकेजमध्ये भुयारीकरणास प्रारंभ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कामाला अधिक गती प्राप्त होईल.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक,
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

सध्या या पॅकेज अंतर्गत ३४२ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मरोळ नाका या पॅकेज ७ अंतर्गत २ टीबीएमद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे १.२ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये सध्या वैनगंगा १ व २ या मशिनद्वारे ३९५ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

Web Title:  Metro 3: 2km of Tunnel under Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.