मेट्रो-३ : १०८ कांदळवनाच्या बदल्यात ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे होणार रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:05 AM2020-11-28T04:05:26+5:302020-11-28T04:05:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पातील धारावी व बीकेसी स्थानकांच्या बांधकामासाठी एकूण १०८ कांदळवन बाधित झाले ...

Metro-3: 8,888 Kandalvan saplings to be planted in lieu of 108 Kandalvan | मेट्रो-३ : १०८ कांदळवनाच्या बदल्यात ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे होणार रोपण

मेट्रो-३ : १०८ कांदळवनाच्या बदल्यात ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे होणार रोपण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पातील धारावी व बीकेसी स्थानकांच्या बांधकामासाठी एकूण १०८ कांदळवन बाधित झाले होते. त्या बदल्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे एकूण ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे रोपण करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व वन विभाग यांच्याद्वारे कोपरखैरणे, नवी मुंबई येथून पर्यायी कांदळवन रोपण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांनी सांगितले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ सारखे महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रकल्प राबवीत असताना हरित धोरणाचे कठोर पालन केले जाईल. पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यात शक्य होतील ते सर्व प्रयत्न केले जातील. पर्यायी कांदळवन रोपण हे त्यादृष्टीने उचललेले पाऊल आहे. कार्यकारी संचालक आर. रमणा म्हणाले की, २ हेक्टर भागात कांदळवनाचे रोपण करण्यात येईल. रायझोफोरा मुक्रोनाटा व सेरिओपस टॅगल या दोन प्रजातींचे रोपण येथे केले जाणार आहे.

Web Title: Metro-3: 8,888 Kandalvan saplings to be planted in lieu of 108 Kandalvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.