मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘आजादी का अमृत महोत्सवा’स प्रारंभ झाला.
भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, कर्तृत्व आणि स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारद्वारे ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या उपक्रमात डिजिटल माध्यमातून सहभाग घ्यावा आणि राष्ट्रगान गायनाचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे मुख्यालय आणि हॉलमार्क प्लाझा कार्यालयामध्ये सामूहिक राष्ट्रगान गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोविड -१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
यावेळी संचालक एस. के. गुप्ता, संचालक ए. ए. भट्ट, संचालक अबोध खंडेलवाल, कार्यकारी संचालक आर. रमणा, कार्यकारी संचालक राजीव आणि कार्यकारी संचालक राजीव कुमार उपस्थित होते.