मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील सीएसएमटी ते मुंबई सेंट्रलपर्यंत भुयारीकरण गुरुवारी पूर्ण झाले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) हे काम करण्यात आले असून, एकाच टप्प्यात सलग चार किमी अंतराचे पहिलेच भुयारीकरण आहे. एमएमआरसीने हा मार्गिकेतील २८वा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. एकाच टप्प्यात सलग ४ किमी अंतराचे भुयारीकरण करणारे वैतरणा-२ हे मेट्रो-३ चे पहिले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) ठरले.मेट्रो-३ मार्गिकेतील पॅकेज-२च्या वैतरणा २ या टीबीएमद्वारे भुयारीकरणास फेब्रुवारी २०१८मध्ये सीएसएमटी लाँचिंंग शाफ्ट येथून सुरुवात झाली होती. एकूण २७३० काँक्रिट रिंग्ंसचा वापर करत मेट्रो-३ मार्गिकेवरील मुंबई सेंट्रलपर्यंतच्या सर्वांत जास्त अंतराचा पल्ला वैतरणा-२ टीबीएमने गाठला. यावर प्रतिक्रिया देताना मेट्रो-३ एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंंह देओल म्हणाले, पॅकेज २ अंतर्गत येणारा भाग हा समुद्रकिनाऱ्याला समांतर होता. तसेच या मार्गावर अनेक जीर्ण आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी १-४ मीटर इतक्या जवळ अंतरावर होती, त्यामुळे मार्गिकेतील भुयारीकरणाचा हा टप्पा सर्वांत आव्हानात्मक होता.कोविड-१९च्या साथीमुळे हे काम अधिक आव्हानात्मक झाले होते. मात्र राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे पालन करून हे काम पूर्ण केले, असेही देओल म्हणाले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रल दरम्यान ४ किमी भुयारीकरणाअंतर्गत सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रांट रोड आणि मुंबई सेंट्रल या पाच भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.>समुद्रकिनाºयामुळे आव्हानपॅकेज २ अंतर्गत येणारा भाग हा समुद्रकिनाºयाला समांतर होता. तसेच या मार्गावर अनेक जीर्ण आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी १-४ मीटर इतक्या जवळ अंतरावर होती, त्यामुळे हा टप्पा सर्वांत आव्हानात्मक होता.
मेट्रो-३ : सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल भुयारीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 12:57 AM