मेट्रो ३ :बॅरिकेड्स हटवावेत, अग्निशमन दलाची हायकोर्टाला विनंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 02:33 AM2017-11-03T02:33:15+5:302017-11-03T02:33:26+5:30

एखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्निशमन दलाला फायर इंजिन नेण्यासाठी समस्या होऊ नये, याकरिता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएआरसीएल) मेट्रोचे काम सुरू आहे, तिथे लावलेले बॅरिकेड्स हटवावेत, अशी विनंती अग्निशमन दलाने उच्च न्यायालयाला गुरुवारी केली.

Metro 3: Delete Barricades, request fire service of fire brigade | मेट्रो ३ :बॅरिकेड्स हटवावेत, अग्निशमन दलाची हायकोर्टाला विनंती 

मेट्रो ३ :बॅरिकेड्स हटवावेत, अग्निशमन दलाची हायकोर्टाला विनंती 

Next

मुंबई : एखाद्या ठिकाणी आग लागली तर अग्निशमन दलाला फायर इंजिन नेण्यासाठी समस्या होऊ नये, याकरिता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएआरसीएल) मेट्रोचे काम सुरू आहे, तिथे लावलेले बॅरिकेड्स हटवावेत, अशी विनंती अग्निशमन दलाने उच्च न्यायालयाला गुरुवारी केली.
मेट्रोचे काम सुरू असलेल्या दक्षिण मुंबईची पाहणी करत अग्निशमन दलाने गुरुवारी उच्च न्यायालयात तीन पानी अहवाल सादर केला. मेट्रोचे काम सुरू असलेल्या परिसराची पाहणी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेच गेल्या सुनावणीत अग्निशमन दलाला दिले होते. त्याची अंलबजावणी करत अग्निशमन दलाने या परिसराचे सर्वेक्षण केले व तीन पानी अहवाल न्यायालयात सादर केला.
कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील इमारतींजवळ फायर इंजिन जाऊ शकते. मात्र, कफ परेड येथे एमएमआरसीएलने तात्पुरते लावलेले बॅरिकेड्स हटवावेत, अशी विनंती अग्निशमन दलाने न्यायालयाला केली आहे. येथील सर्व इमारतींना त्यांच्याकडी आग प्रतिबंधक यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही अग्निशमन दलाने न्यायालयाला दिले.
मेट्रो- ३ च्या कामामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. तसेच या कामामुळे दक्षिण मुंबईतील एखाद्या इमारतीस आग लागली तर फायर इंजिन जाऊ शकत नाही. त्यामुळे एमएमआरसीएलला योग्य ती सोय करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका कुलाब्याचे रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Web Title: Metro 3: Delete Barricades, request fire service of fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो