मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरु असून, मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या दाव्यानुसार, एकूण ५४.५ किलो मीटरपैकी ४८ किलो मीटर भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
मेट्रो-३ मार्गाचे भुयारीकरण पूर्ण करण्यासाठी भुयारीकरणाचे केवळ ९ टप्पे गाठणे बाकी आहेत. उर्वरित भुयारीकरण पॅकेज १, ३, ४ व ६ या अंतर्गत पूर्ण होणार आहे. तर आतापर्यंत ३२ टप्पे पूर्ण झाले आहेत. हे पॅकेज २,५,७ अंतर्गत आहेत.
सोमवारी १.१० किलो मीटरचा भुयारीकरणाचा ३२ वा टप्पा पूर्ण करण्यात आला. हे भुयारीकरण सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानक इतके आहे. तर आतापर्यंत एकूण ९४ % भुयारीकरण आणि ९५ % खोदकाम पूर्ण झाले आहे. पूर्ण प्रकल्पाचा विचार करता ८७ % भुयारीकरण आणि ६० % बांधकाम पूर्ण झाले आहे.
-----------------------
मेट्रो-३ मार्ग अत्यंत मुंबईतील दाटीवाटीची वस्ती, जुन्या इमारती, ऐतिहासिक वारसा तसेच उत्तुंग इमारती, उड्डाणपुल, मेट्रो मार्ग व रेल्वे मार्गाखालून जात आहे. येथे भुयारीकरण करणे आव्हानात्मक आहे. या प्रकल्पासाठी एकूण १७ टनेल बोरिंग मशीन एकाच वेळेला कार्यरत आहेत.
- सुबोध गुप्ता, संचालक/प्रकल्प, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
-----------------------
९ टप्पे गाठणे बाकी
टप्पा आणि स्थानक३३ चर्चगेट ते हुतात्मा चौक३४ सिध्दीविनायक ते दादर३५ सहार रोड ते सीएसएमआयए आंतरदेशीय३६ हुतात्मा चौक ते सीएसएमटी३७ चर्चगेट ते सीएसएमटी३८ सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी३९ सायन्स म्युझियम ते महालक्ष्मी४० महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल४१ महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल
-----------------------