मेट्रोचे मिठी नदीखालील भुयारीकरण ९० टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 01:13 AM2020-02-28T01:13:48+5:302020-02-28T01:15:28+5:30

मेट्रो-३ प्रकल्प : दीड किलोमीटरपैकी ९०० मीटरचे भुयारीकरण

metro 3 project 90 percent work related with mithi river completed | मेट्रोचे मिठी नदीखालील भुयारीकरण ९० टक्के पूर्ण

मेट्रोचे मिठी नदीखालील भुयारीकरण ९० टक्के पूर्ण

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील सर्वात महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असलेले मिठी नदीच्या खालून करण्यात येत असलेले भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) सुरू असून आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १.५ किमी भुयारीकरणापैकी ९०० मीटरचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) ते धारावी दरम्यान ९० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असे एमएमआरसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

बीकेसी परिसरामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र आणि अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने येथे मोठी वर्दळ असते. मेट्रो-३ कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांना या ठिकाणी सहज पोहोचणे शक्य होणार आहे. बीकेसी येथील भुयारीकरण टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) तसेच पारंपरिक एनएटीएम पद्धतीचा वापर करून करण्यात येत आहे. या स्थानकासाठी मिठी नदीच्या खालून भुयारीकरण केले जात आहे. मिठी नदीखालून केले जाणारे भुयारीकरण ‘अर्थप्रेशर बॅलन्स’ पद्धतीच्या टीबीएमद्वारे आणि काही भागातील भुयारीकरण हे एनएटीएम पद्धतीचा वापर करून करण्यात येत असल्याचे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले.

एनएटीएमद्वारे भुयारीकरण तीन भागांत करण्यात येणार आहे. टॉए हेडिंग, बेचिंग व इन्व्हर्र्ट, पहिल्या टण्यात वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून दगडाला आधार दिला जातो. लहान एस्के वेटरचा वापर करून कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे मिठी नदीखाली बोगदे बनविण्यात येणार आहेत. बीकेसी स्थानक १८ मीटर खोल असून त्याची लांबी ४७४ मीटर आहे. या स्थानकांत दोन स्टेबलिंग लाइन्स असणार आहेत.

मिठी नदीखाली तीन बोगदे!
कफ परेड ते बीकेसी दरम्यान अधिक प्रमाणात गाड्या धावणार असल्याने या स्थानकामध्ये तीन मार्ग आहेत. गर्दीच्या वेळी गाड्यांचे जलद संचलन होण्यासाठी या लाइन्स उपयुक्त ठरतील. गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्या गाड्या लाइनवर उभ्या करण्यात येतील. मिठी नदीखालून तीन बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी दोन टीबीएमद्वारे तर एक १५३ मीटर लांबीचा बोगदा एनएटीएमद्वारे बांधण्यात येत आहे. पॅकेज-५ अंतर्गत बीकेसीसह धारावी, विद्यानगरी आणि सांताक्रुझ स्थानकेदेखील येतात. या पॅकेजचे एकूण ८९ टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

Web Title: metro 3 project 90 percent work related with mithi river completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो