मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे पुनर्वसनाचे काम सुरू झाले आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकामुळे बाधित होणाऱ्या १२० प्रकल्पबाधित कुटुंबे व ७ व्यावसायिकांना त्यांच्या सदनिकांच्या चाव्यांचे वाटप प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.मेट्रो-३च्या प्रस्तावित वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकामुळे जवळपास १६० घटक बाधित होणार आहेत. त्यापैकी १२० हे घरगुती घटक आहेत. २४ व्यावसायिक आणि ७ व्यावसायिक अधिक घरगुती आहेत. शिवाय यात एका मंदिराचा आणि पोलीस चौकीचाही समावेश आहे. व्यावसायिक घटकांच्या पुनर्वसनाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर मंदिर आणि पोलीस चौकीचे स्थलांतरण जवळपासच्या परिसरात करण्यात येणार आहे. एकूण सात कुटुंबे पुनर्वसनाकरिता अपात्र ठरली असून, त्यांनी प्रथमस्तरीय गाऱ्हाणे निवारण समितीकडे यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सदनिकावाटपाची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबवण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या सदनिका वाटप पत्रावर बारकोडसह त्यांची डिजिटल स्वाक्षरी, छायाचित्र नमूद आहे.
मेट्रो-३ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन
By admin | Published: May 31, 2016 6:14 AM