मुंबई : मुंबईतील विविध भागांमध्ये मेट्रो मार्गिका बांधण्यात येणार आहे. कुलाबा वांद्रे सीप्झ या मार्गावर भुयारीमार्गे मेट्रो धावणार आहे. या मेट्रो-३ मार्गिकेमध्ये हाय अँट्युनेशन टिष्ट्वन ब्लॉक स्लीपर या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे धावणाऱ्या मेट्रोमध्ये कंपने कमी होणार आहेत. अशाप्रकारचे देशामध्ये प्रथमच मुंबई मेट्रो ३ प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा वापरण्यात येणार आहे.मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन (एमएमआरसी) अंतर्गत बीकेसी ते कफ परेड स्थानकांदरम्यान मेट्रो रूळांची बांधणी करण्याचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो कंपनीला केले आहे. अपलाईन तसेच डाऊनलाईन मिळून ४७ किमी रूळ बांधण्यात येणार आहे. या कंत्राटाअंतर्गत रूळ उभारणीसंदर्भातील उत्तम दर्जाच्या रुळांची खरेदी आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग इत्यादी कामांचा समावेश राहील.एमएमआरसीचे प्रकल्प संचालक व प्रभारी व्यवस्थापकीय संचालक सुबोध गुप्ता यासंदर्भात म्हणाले की, या प्रकल्पासाठी ट्रॅक एक महत्वाचा घटक आहे. मेट्रो-३ मार्गिकेवरील ऐतिहासिक वारसा इमारती असल्याकारणाने अत्याधुनिक ट्रॅक यंत्रणा या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे कंपने आणि ध्वनीचा प्रभाव जाणवणार नाही. तसेच प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल.
मेट्रो-३ मार्गिकेवर कंपनमुक्त धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:42 AM