मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:23 PM2020-06-18T17:23:13+5:302020-06-18T17:24:26+5:30

आतापर्यंत भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पुर्ण झाले आहे.

Metro-3 Susat: With 83% undergrounding, 56% of the project was completed | मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के

मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के

Next


मुंबई  : देशभरात कुतूहलाचा विषय ठरलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामाने सुरुवातीपासून पकडलेला वेग आजही कायम आहे. सद्यस्थितीमध्ये मेट्रो-३ च्या भुयारीकरणासह उर्वरित काम वेगाने सुरु  असून, आतापर्यंत भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पुर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरात कोसळत असलेल्या मान्सूनदरम्यानही मेट्रो-३ च्या कामाला ब्रेक लागलेला नाही.

मंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो-३ ही वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो २-ब ला जोडली जाईल.  याव्यतीरिक्त चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, महालक्ष्मी येथील मोनोरेल स्थानक, मेट्रो-१ ला मरोळ, मेट्रो-६ ला आरे येथे मेट्रो-३ जोडली जाईल. शिवाय विमानतळाशीदेखील मेट्रो-३ कनेक्ट असेल.  या भुयारी मार्गावर धावणा-या मेट्रोचे रुळ मुंबईत आले असून, हा रुळांचा संच जपानमधील यावाटा येथून ४ आठवडयाच्या कालावधीत सागरी मार्गाने मुंबईत आणण्यात आला होता. मेट्रो धावत असताना कमीत कमी कंपने आणि ध्वनी  निर्माण करणे ही देखील या यंत्रणेची वैशिष्टय आहेत. मुंबईतील प्राचीन वास्तु यांना इजा पोहचणार नाही या दृष्टीनेही ही यंत्रणा उपयुक्त आहे.

मुंबईच्या रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे मधील गर्दी कमी करू शकतो. मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध होतील. संपूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गावर २७ स्थानके असतील. पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील. भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे, असा दावा देखील एमएमआरसीने केला आहे.

 

Web Title: Metro-3 Susat: With 83% undergrounding, 56% of the project was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.