Join us

मेट्रो-३ ट्रॅकवर

By admin | Published: October 27, 2015 1:40 AM

बहुचर्चित असा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्प आता ट्रॅकवर येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी ८३ टक्के जमीन संपादित करण्यात

मुंबई - बहुचर्चित असा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्प आता ट्रॅकवर येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी ८३ टक्के जमीन संपादित करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने देण्यात आली. यात तात्पुरत्या स्वरूपात घेतलेली जमीन प्रकल्प समाप्तीनंतर पुन्हा संबंधितांना परत केली जाणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी एकूण ७५.२२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी १३.0२ हेक्टर जमीन कायमस्वरूपी तर ६२.२0 हेक्टर जमीन तात्पुरत्या स्वरूपात संपादित करण्याची आवश्यकता आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने आतापर्यंत ६२.४३ हेक्टर जमीन ताब्यात घेतली असून त्यापैकी २.१६ हेक्टर जमीन कायमस्वरूपी तर ६0.२७ हेक्टर जमीन तात्पुरत्या स्वरूपात घेतली आहे. तात्पुरत्या स्वरूपात घेतलेली जमीन प्रकल्पाचे काम संपताच पुन्हा संबंधितांना परत केली जाणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले. प्रकल्पाला लागणारी उर्वरित कायमस्वरूपी व तात्पुरत्याा स्वरूपात लागणारी जमीन ही मुंबई महानगरपालिकेकडून संपादित करायची आहे व त्याकरिता प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात जमीन संपादन करावयाच्या असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणास सुधारणा समितीकडून मंजुरीदेखील मिळाली आहे आणि पुढील मंजुरीसाठी महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे भिडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)मेट्रो-३ प्रकल्पामुळे काय होईल?या प्रकल्पामुळे दररोज जवळपास १४ लाख प्रवासी प्रवास करू शकतील. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळापर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेची सुविधा प्रवाशांना मिळेल. १२ शैक्षणिक केंद्रे, ११ रुग्णालये, ३0 रोजगार केंद्रे, शासकीय व अशासकीय कार्यालये जोडली जाणार.४ लाख ५६ हजार ७७१ वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन दररोज जवळपास २.५ लाख लीटर्स इंधनाची बचत होईल.