मेट्रो-३ साठी ‘मिठी’खालून ९१५ मी. भुयारीकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:42 AM2019-11-29T03:42:03+5:302019-11-29T03:42:32+5:30

कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत जमिनीच्या खालून ३८.२८ किमीपर्यंत भुयार तयार करण्यात आले

For Metro-4, under 'Mithi', it is 19m. Done leveling | मेट्रो-३ साठी ‘मिठी’खालून ९१५ मी. भुयारीकरण पूर्ण

मेट्रो-३ साठी ‘मिठी’खालून ९१५ मी. भुयारीकरण पूर्ण

Next

मुंबई : कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत जमिनीच्या खालून ३८.२८ किमीपर्यंत भुयार तयार करण्यात आले असून यासह मिठी नदीच्या खालून ९१५ मीटर लांबीचे भुयार तयार करण्यात आले आहे. मिठी नदी खालून तीन भुयार बनविण्यात येणार आहेत. यामध्ये १.५ किमी लांबीचे दोन आणि १५४ मीटरचे तीसरे भुयार बनविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ६६० मीटर, दुसरे २४० मीटर आणि तिसरे १५ मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-३ मर्गिकेवरील धारावी आणि बीकेसीदरम्यान मिठी नदीखालून १.४ किमी लांबीचा भाग आहे. या दोन्ही मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी मिठी नदीच्या खाली भुयारीकरण करण्यात येणार आहे. हे काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

बीकेसी आणि धारावीदरम्यान पाण्याखालून सुमारे २५ मीटर खालून मेट्रो जाणार आहे. मिठी नदीखालून १.५ किमीचे दोन भुयार आणि १५४ मीटरचे तिसऱ्या भुयाराचा वापर स्टैबलिंग लाईनसाठी करण्यात येणार आहे. बीकेसी स्थानकापासून काही मेट्रो रद्द होऊन पुन्हा परत जाणार आहे. रद्द केलेल्या मेट्रो टेÑनचा मार्ग बदलण्यासाठी या मार्गाचा उपयोग करण्यात येणार आहे. या भुयारीकरणाचे काम टनेल बोरिंग मशीनतर्फे (टीबीएम) करण्यात येत आहे.

टीबीएमच्या साहाय्याने मिठी नदीखालून आत्तापर्यंत ९०० मीटरपर्यंत भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर नेटम ही तांत्रिक पद्धती वापरून १५४ मीटर लांबीचे भुयार तयार करण्यता आले आहे.

Web Title: For Metro-4, under 'Mithi', it is 19m. Done leveling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.