Join us

मेट्रो-४ घेणार १८ झाडांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 3:21 PM

Mumbai metro : एकूण २८ झाडे बाधित

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणा-या मेट्रो-४ च्या कामा अंतर्गत १८ झाडांचा बळी जाणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत एकूण २८ झाडे बाधित होत आहेत. या पैकी १८ झाडे कापली जाणार आहेत. ६ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. ४ झाडे आहे तशीच ठेवली जाणार आहेत.

सुत्रांकडील माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एम/पश्चिम विभागातील मुंबई मेट्रो लाईन-४ अंतर्गत गरोडिया नगर ते सुर्या नगर दरम्यान बाधित झाडांच्या कारवाईसाठी महापालिकेकडे परवानगी मागण्यात आली होती. जेव्हा २५ पेक्षा अधिक झाडे तोडली जात असतील तर तो विषय मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणासमोर मांडला जातो. झाडे २५ पेक्षा कमी असतील तर याबाबत आयुक्त स्तरावर कार्यवाही केली जाते.

मेट्रो-४ बाबत दाखल झालेल्या झाडांच्या प्रस्तावाचा विचार करता येथे २८ झाडे अस्तित्त्वात आहेत. त्यापैकी २४ झाडे  बाधित होत आहेत. बाधित झाडांपैकी १८ झाडे कापली जाणार आहेत. ६ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. ४ झाडे आहे तशीच ठेवली जाणार आहेत.

----------------

पर्जन्यवृक्ष ९जंगली बदाम ५पेल्टोफोरम १जांभूळ १ग्लिरिसिडिया १भेंडी १एकूण १८ 

टॅग्स :मेट्रोमुंबईपर्यावरणमुंबई महानगरपालिका