मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व दरम्यानच्या मेट्रो-७ मार्गिकेची विविध कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वेगाने सुरू केली आहेत. ही मार्गिका यावर्षी डिसेंबरपूर्वी सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनच्या काळातही एमएमआरडीएने मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना सुरुवात केली आहे. या मार्गिकेसाठी ४८३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मेट्रो-७ मार्गावर गर्डरच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात मेट्रो-७ मार्गिकेच्या चार स्थानकांसाठी ३० कंटेनरमधून १२ सरकते जिने आणि दोन लिफ्टची आयात करण्यात आली आहे.यावेळी ही सामग्री सॅनिटायझर करण्यात आली असून सामग्री प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर दाखल झाली. मेट्रो-७ मार्गावर विकासकामे सुरू झाली आहेत. यासाठी या मार्गावरील पोईसर, मागाठाणे, दिंडोशी या स्थानकांवर प्रत्येकी चार सरकते जिने, तर आकुर्ली स्थानकात दोन लिफ्ट दाखल झाल्या आहेत. तसेच विविध प्रकल्पस्थळी काम करणाऱ्या कामगारांची एमएमआरडीएमार्फत विशेष काळजी घेतली जात आहे.कामगारांची डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक सर्व गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. त्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असून त्यांना स्वच्छतेचे धडेही दिले जात आहेत, असे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले. तसेच मेट्रो-७ मार्गिकेच्या कामालाही वेग आला आहे. यासह या मार्गिकेवरील स्थानकांमध्ये बसवण्यात येणाºया एक्सलेटरपैकी १२ एक्सलेटर नुकतेच आणण्यात आले असून, दोन लिफ्ट आणण्यात आल्या आहेत़
वर्षाअखेर सुरू होणार मेट्रो-७ मार्गिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 3:31 AM