मुंबई : मुंबईमेट्रो मार्ग ९ मधील सिल्व्हर पार्क, भाईंदर येथे उच्चदाब विद्युत प्रवाहाच्या वाहिनीजवळच्या १.५ किमी भागातील मेट्रो वायाडक्ट उभारणीसाठीचे एलिमेंट्स उभारून एमएमआरडीएने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. २२ ते २७ जुलै या कालावधीत मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी ६ दरम्यान वीजपुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण करण्यात आले.
मीरा-भाईंदर शहराला जोडणाऱ्या ८ स्थानके असलेल्या १०.५८ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग ९ चे बांधकाम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. मेट्रो मार्ग ९ हा मेट्रो मार्ग ७ च्या उत्तरेकडील विस्तार आहे. ही मार्गिका इतर मेट्रो कॉरिडॉरपेक्षा वेगळी आहे.
- मेट्रो टीमने या भागातील यू आणि आय आकारातील व्हायाडक्ट एलिमेंट्स आणि टी, एल गर्डर्स, प्लॅटफॉर्म पिअर कॅप आणि काँकोर्स पिअर कॅपसारखे स्टेशन एलिमेंट्स यशस्वीरित्या उभारले.
वीजपुरवठा नियंत्रित क्रेनवर सुरक्षित नियंत्रण आणि कामगारांचे संरक्षण सुनिश्चित करून हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याने या मार्गाजवळचा वीजप्रवाह नियंत्रित केला होता. या भागातील २२० के.व्ही.च्या उच्चदाब विद्युत वाहिन्या राज्य भार प्रेषण केंद्र आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांच्या देखरेखीखाली विद्युत पुरवठा नियंत्रित करून हे काम पूर्ण केले.
काय काम पूर्ण?- या भागांच्या उभारणी सोबत मेट्रो लाइन ९ च्या स्थानकांमध्ये जवळपास ९० टक्के प्रमुख घटकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.प्रतिकूल हवामान असतानाही, मेट्रो मार्ग वेळेवर पूर्ण होण्यासाठी मेट्रोची संपूर्ण टीम अथक परिश्रम करत आहे. हा उपक्रम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी वीजपुरवठा नियंत्रित करणे आवश्यक होते. विशेषत: घोडबंदर वर्सोवा आणि घोडबंदर गोराईला वीजपुरवठा करणाऱ्या महत्त्वाची उच्चदाब वीज वहिनी असल्याने हे काम कठीण होते. - डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए