मुंबई : नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत अंधेरी पश्चिम आणि गुंदवली स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे.
सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त सेवांचा समावेश आहे. गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार - शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत २५३ मेट्रोसेवा आहे. शनिवारी, रविवार २०५ मेट्रोसेवा आठ ते साडेदहा मिनिटांने असेल. अंधेरी, गुंदवली स्थानकावर शेवटची मेट्रो १:३० वाजता पोहोचेल.
नवरात्र उत्सवादरम्यान रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा करता येईल. प्रवासी मेट्रोला पसंती दर्शवित आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरमहा सरासरी ५ टक्क्यांची वाढ आहे. नवरात्रोत्सव काळात अतिरिक्त सेवा सुरू केल्याने वाढ होईल. - डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए