लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांजूरमार्ग येथील जागेवर मेट्रोचे कारशेड उभे राहणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर आता जवळपास मिळाले आहे. कारण राज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कांजूर येथील जागेच्या आरक्षणात बदल केला असून, ही जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात आली आहे. त्यानुसार भविष्यात येथे मेट्रो आणि तत्सम कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, एमएमआरडीएने २०१८ रोजी कांजूर येथील ४३.७६ हेक्टर जागा मेट्रो आणि इतर कामांकरिता वापरण्यासाठी आरक्षणात बदल करावा, अशी विनंती केली होती. याव्यतिरिक्त कांजूर येथील मेट्रोसाठी एमएमआरडीए हे विशेष अधिकारी म्हणून काम पाहत असून एमएमआरडीएची विनंती आणि मुंबई महापालिकेचा अहवाल या दोन्ही गोष्टींचा विचार करता येथील जमीन सार्वजनिक हितासाठी वापरणे योग्य आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
या सर्व गोष्टींचा केलेला विचार, घेण्यात आलेला सल्ला, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि इतर घटकांमुळे कांजूर येथील जागेच्या आरक्षणात बदल करणे योग्य असल्याचा निर्वाळा नगर विकास विभागाने अधिसूचनेत दिला. आणि त्यानुसारच, सदर फेरबदल मंजूर करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. या सर्व प्रक्रियेनंतर सदर जमिनीवरील आरक्षण बदल करण्याबाबत हालचाली झाल्या असून आजच्या अधिसूचनेनंतर येथील मेट्रो डेपोचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिली.
जागा वापरता येणे शक्यराज्याच्या नगरविकास विभागाने बुधवारी जी अधिसूचना काढली आहे त्यानुसार कांजूर येथील मेट्रोच्या जागेच्या आरक्षणात बदल केला असून भविष्यात येथील जागा मेट्रो आणि तत्सम प्रकल्पासाठी वापरता येऊ शकते. मेट्रो डेपो येथे उभा राहू शकतो.- झोरू बाथेना, आरे आंदोलकपर्यावरणाच्या ऱ्हासातून हाेणारी प्रगती अमान्य!nपर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली हाेती. nही जागा शून्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेतली आहे. शासनाचा एकही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते.
खर्च अजिबात वाया जाणार नाही - मुुख्यमंत्रीमेट्रो ३ चा कारशेड कांजूर मार्गमध्येच उभारला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. आरेमध्ये कारशेडवर झालेला खर्च अजिबात वाया जाणार नाही. भविष्यातील पाचपन्नास वर्षांचा विचार करता कारशेड कांजूरमार्गमध्येच होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.