मुंबई : एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येणाऱ्या दहिसर ते डी. एन. नगर मार्गावरील मेट्रो २ अ, डी. एन. नगर ते मंडाळे मार्गावरील मेट्रो २ ब आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गावरील मेट्रो ७ प्रकल्पांतील ३७८ कोचेस आता भारतातच बनणार आहेत. एका कोचपाठी एमएमआरडीएला ७ कोटी ९८ लाख रुपयांचा खर्च येतो. भारतीय कंपनीला हे कोच बनविण्याचे काम दिल्यामुळे आणि याचे काम भारतातच होणार असल्याने, एमएमआरडीएच्या तब्बल १,१०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत उभयपक्षी सहकार्याच्या आधारावर अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘मेक इन इंडिया’च्या पार्श्वभूमीवर कोचनिर्मितीचे काम भारतातच करण्याचे ठरले आहे. हे काम भारत अर्थ मूव्हर्सला देण्यात आले आहे. या कंपनीला तांत्रिक साहाय्यही केले जाईल. सर्व कोच देशात उपलब्ध असणाºया अत्याधुनिक निकषांनुसार तयार होणार असून, ते ३.२ मीटर रुंदीचे आणि २५ किलोवॅट क्षमतेच्या विद्युत प्रणालीवर कार्यरत होणारे आहेत. दोन गाड्यांच्या फेºयांमध्ये केवळ ९० सेकंदाचे अंतर राखणाºया या गाड्या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
सर्व कोच अत्याधुनिक स्वरूपाचे, वजनाने हलके आणि वातानुकूलित असतील. संबंधित सर्व गाड्या या चालक-विरहित प्रणालीवर चालणाºया असल्या, तरी प्रारंभी काही काळ त्या चालकांमार्फत चालविल्या जातील. या गाड्यांमध्ये विशेष व्यक्तींसाठी, तसेच महिला व वरिष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधांनी सज्ज डबे असतील.
सर्व सुखसोयींनी युक्त अशा पहिल्या काही गाड्या प्रकल्प २ अ आणि ७ वरील चाचणी परीक्षणासाठी पुढील वर्षी उपलब्ध होतील. यशस्वी चाचण्यांनंतर दर तीन महिन्यांनी १२ ट्रेन पुरविण्यात येणार असून, २०० आठवड्यांत गाड्या पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, प्रवाशांची सर्वोच्च सुरक्षा आणि ऊर्जेच्या सुयोग्य वापराची खात्री देणारा हा करार आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.सुरक्षेला प्राधान्यक्लोज सर्किट टीव्हीद्वारे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. गाडीतीलआग नियंत्रण यंत्रणेसह प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअरसह उद्घोषणेद्वारे त्वरित माहिती देणारी यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय रुळांवर आयत्या वेळी काही अडथळा आल्यास, तो दूर करणारी यंत्रणाही विकसित करण्यात येईल.