दहिसर, भार्इंदरपर्यंत मेट्रो
By admin | Published: June 20, 2016 04:04 AM2016-06-20T04:04:03+5:302016-06-20T04:04:03+5:30
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर, मेट्रोचा अधिकाधिक विस्तार करण्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कल असून
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गाला प्रवाशांकडून तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर,
मेट्रोचा अधिकाधिक विस्तार करण्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा कल असून, भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुसह्य व्हावा, म्हणून दहिसर, मीरारोड आणि भार्इंदरपर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए विचार करत आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी मेट्रो संचालक पी. आर. के. मूर्ती आणि प्राधिकरणाच्या अन्य अधिकारी वर्गासमावेत डी.एन. नगर ते मानखुर्द मेट्रो २ आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ ची पाहणी केली, या वेळी प्रवीण दराडे बोलत होते.
पाहणीच्या वेळी त्यांनी मंडाले आणि कासारवडवलीमधील
ओवळे येथे दाखल होत, मेट्रो कार डेपोच्या जागेसह पुनर्वसनासंबंधीच्या मुद्द्यांची माहिती घेतली. या वेळी दराडे यांनी मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा मुद्दाही आवर्जून मांडला. (प्रतिनिधी)
मेट्रो २ चा मार्ग : डी.एन.नगर ते मानखुर्द मेट्रो
मेट्रो २ चा खर्च : १०,९८६ कोटी
मेट्रो ४ चा मार्ग : वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली
मेट्रो ४ चा खर्च : १४,५४९ कोटी
२ वरील मार्ग
डी.एन. नगर, एसिकनगर, प्रेमनगर, इंदिरानगर, नानावटी रुग्णालय, खिरानगर, सारस्वतनगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, एमएमआरडीए कार्यालय, आयकर कार्यालय, आय.एल अँड एफ.एस., एम.टी.एन.एल मेट्रो, एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनस, कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती महामार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बी.एस.एन.एल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले मेट्रो कारशेड
मेट्रो ४ वरील मार्ग
वडाळा डेपो, भक्ती पार्क, मेट्रो आणिकनगर बस डेपो, सुमननगर, सिद्धार्थ कॉलनी, अमर महल जंक्शन, गरोडीया नगर, पंतनगर, लक्ष्मीनगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्यानगर, गांधीनगर, नवल हाउसिंग, भांडुप मेट्रो, शांग्रीला सोनापूर, मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, तीन हात नाका(ठाणे), आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजीनी वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली.