Join us

मेट्रो भाडेवाढ तूर्तास टळली

By admin | Published: June 23, 2016 4:15 AM

मुंबई मेट्रोची भाडेवाढ पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. मेट्रो भाडेवाढीच्या याचिकेवरची सुनावणी १२ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई: मुंबई मेट्रोची भाडेवाढ पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. मेट्रो भाडेवाढीच्या याचिकेवरची सुनावणी १२ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावेळी मात्र थेट अंतिम सुनावणी घेऊन मेट्रोच्या भाववाढीचा निर्णय होईल.दरनिश्चिती समितीने (एफएफसी) मेट्रोला वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर या ११. ४ कि. मी मार्गासाठी १० रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्याची परवानगी दिली. एफएफसीच्या या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली . ही याचिका प्रलंबित असतानाच एमएमओपीलएने १ डिसेंबर २०१५ पासून सध्या आकारल्या जाणाऱ्या भाड्यात किमान पाच रुपयांची भाडेवाढ करून देण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१५ रोजी या अंतरिम भाडेवाढीला स्थगिती दिली.बुधवारच्या सुनावणीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने या याचिकेवर १२ जुलै रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे. या याचिकेवरील सुनावणी १२ जुलै रोजी ठेवल्याने उच्च न्यायालयाने अंतरिम भाडेवाढीला दिलेली स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)