Join us  

मेट्रो भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळणार

By admin | Published: August 08, 2015 2:03 AM

मुंंबई मेट्रोच्या नविन तिकिट दरवाढीला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे रिलायन्सची मुंबई मेट्रो मुंबईकरांचा खिसा कापणार

मुंबई : मुंंबई मेट्रोच्या नविन तिकिट दरवाढीला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे रिलायन्सची मुंबई मेट्रो मुंबईकरांचा खिसा कापणार हे निश्चित झाले. न्यायालयाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्यामुळे कमीत कमी १0 रुपये तर जास्तीत जास्त ११0 रुपये भाडे होणार आहे. नविन भाड्याची अंमलबजावणी ही आॅक्टोबरनंतरच लागू होईल, अशी माहीती मेट्रोकडून देण्यात आली. नविन भाडेवाढीचा वाद हा जानेवारी २0१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात गेला होता. यात न्यायालयाने दर निश्चिती समिती स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार तीन सदस्यांची दरनिश्चिती समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून कमीत कमी १0 तर जास्तीत जास्त ११0 रुपये भाडेवाढीची शिफारस करण्यात आली होती. समितीकडून नवीन भाड्याचा अहवाल न्यायालयाकडेही सादर करण्यात आला होता. यावर न्यायालयाकडून शुक्रवारी निर्णय देत नविन भाडेवाढीला मंजुरी दिली. स्थानक भाडे (रु)वर्सोवा ते डीएननगर१0वर्सोवा ते आझादनगर२0वर्सोवा ते अंधेरी३0वर्सोवा ते वे.एक्सप्रेस वे४0वर्सोवा ते चकाला५0वर्सोवा ते एअरपोर्ट रोड६0वर्सोवा ते मरोळ नाका७0वर्सोवा ते साकिनाका८0वर्सोवा ते असल्फा९0वर्सोवा ते जागृती नगर१00वर्सोवा ते घाटकोपर११0