Join us

मेट्रो तीनच्या भुयारीकरणाने घेतला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:54 AM

सात टप्प्यांत काम सुरू : २३.६९ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-तीन मार्गाच्या भुयारीकरणाच्या कामाने वेग पकडला असून, आतापर्यंत ५२.२१ किलोमीटर बोगद्याच्या कामापैकी २३.६९ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो तीनचे काम एकूण सात टप्प्यांत सुरू आहे. या सात टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील कफ परेड ते सीएसएमटी मेट्रो स्थानकापर्यंत ५ हजार ८९४ मीटरपैकी १ हजार ८५३ मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक असा असून, या टप्प्यातील ७ हजार ६४० मीटरपैकी ४ हजार १८० मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. टप्पा तीन हा मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानक असा आहे. या टप्प्यातील ७ हजार २९० मीटरपैकी ६८० मीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, वरळी ते धारावी स्थानक या चौथ्या टप्प्यातील १० हजार ९६० मीटरपैकी ६ हजार २६७ मीटर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

याचप्रमाणे, धारावी ते सांताक्रुझ येथील आग्रीपाडापर्यंतच्या पाचव्या टप्प्यातील ७ हजार ९९२ मीटरपैकी ४ हजार ७४४ मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, आग्रीपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस टी-२ स्टेशनपर्यंतच्या सहाव्या टप्प्यातील ६ हजार ९३७ मीटरपैकी १ हजार ८९९ मीटर लांबीच्या बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे. सातवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ ते सारीपूतनगर या टप्प्यातील ७ हजार ७० मीटरपैकी ३ हजार ४१७ मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. अशाप्रकारे आतापर्यंत २३.६९ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्पष्ट केले.

दरम्यान, मेट्रो तीन ही सात मरोळ नाका येथे वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो १, तसेच जेव्हीएलआर येथे प्रस्तावित स्वामी समर्थनगर - जोगेश्वरी - कांजूरमार्ग - विक्रोळी मेट्रो सहा यांना जोडणार आहे. यासोबतच रेल्वे सेवेने न जोडली गेलेली एमआयडीसी, सीप्झ ही औद्योगिक, तसेच रोजगार केंद्रेही मेट्रोमुळे जोडली जातील.

च्पहिला टप्पा - कफ परेड ते सीएसएमटी मेट्रो स्थानकच्दुसरा टप्पा - सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकच्तिसरा टप्पा - मुंबई सेंट्रल ते वरळी स्थानकच्चौथा टप्पा - वरळी ते धारावी स्थानकच्पाचवा टप्पा - धारावी ते सांताक्रुझ येथील आग्रीपाडापर्यंतच्सहावा टप्पा - आग्रीपाडा ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस टी-२ स्टेशनपर्यंतच्सातवा टप्पा - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ ते सारीपूतनगर

टॅग्स :मेट्रो