मुंबई : वैनगंगा-३ या टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी प्रकल्पांतर्गत कामे वेगाने सुरू आहेत. येथील पाली मैदान ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या १.१३ किलोमीटरचे भुयारीकरण ३१८ दिवसांत पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.मरोळ नाका ते आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानचा बेसाल्ट, ब्रेशिया खडकांना भेदण्याचे काम वैनगंगा-३ या टनेल बोअरिंग मशिनने २ एप्रिल, २०१८ पासून सुरू केले. हे मशिन शांघाय टनेलिंग इंजिनीयरिंग कंपनीने तयार केले असून, ते मशिन ९२ मीटर लांबीचे आहे. प्रतिदिन ४.१२ मीटर इतक्या वेगाने हे मशीन भुयारीकरण करते. या मशिननेसध्या कार्यरत असलेली मेट्रो लाइन १ आणि सहार उन्नत मार्गयासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून भुयारीकरणकेले आहे....असे होते भुयारीकरणभुयारीकरण करताना बोगदे खोदाई यंत्राचा वापर करण्यात येतो. या कामासाठी म्हणजे ड्रिलिंगसाठी पर्याय म्हणून अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येते. गोल आडवा छेद घेताना छेदन व विस्फोटन पद्धतीला पर्याय म्हणून वापरले जाते. छेद व आच्छादन अंतर्गत जमिनीस छेद देऊन पुन्हा आच्छादित केले जाते, अशी बांधकामाची पद्धत आहे. नवीन आॅस्ट्रीयन बोगदे खोदाई पद्धत या अंतर्गत आधुनिक बोगदा बांधकाम पद्धतीत खडक किंवा माती गोलाकार पद्धतीने खणून बोगदा तयार केला जातो.रोजगार केंद्रे मेट्रोमुळे जोडणार१५० अभियंते, तंत्रज्ज्ञ आणि कुशल कामगार यांच्या मेहनतीमुळे पॅकेज ७ मधील डाउन मार्गावर ९३७ आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करत तब्ब्ल १.१३ किमी पल्ला गाठण्यात आला.मेट्रो ३चे पॅकेज ७ मरोळ नाका येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ व जेव्हीएलआर येथे प्रस्तावित स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ यांना जोडणार आहे.रेल्वे सेवेने न जोडली गेलेली एमआयडीसी, सीप्झ ही औद्योगिक व रोजगार केंद्रे मेट्रोमुळे जोडली जातील.मेट्रो कामासाठी एकूण १७ टीबीएम मशिन दहा लाँचिंग शाफ्टमधून कार्यरत आहेत.कॉर्पोरेशनने आणखी एक टप्पा गाठला आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई मेट्रो-३ मार्गिका मेट्रो-१ आणि प्रस्तावित मेट्रो-६ मार्गिकेला जोडलीजाईल.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन.
मेट्रो तीनचे भुयारीकरण ‘वैनगंगा’च्या मदतीने वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 3:01 AM