Join us  

मेट्रोची भाडेवाढ १७ डिसेंबरपर्यंत स्थगित

By admin | Published: December 01, 2015 4:21 AM

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोची भाडेवाढ १७ डिसेंबरपर्यंत टळली आहे. दर निश्चिती समितीविरोधात एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोची भाडेवाढ १७ डिसेंबरपर्यंत टळली आहे. दर निश्चिती समितीविरोधात एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी मेट्रोने पुढील सुनावणीपर्यंत भाडेवाढ करत नसल्याचे आश्वासन उच्च न्यायालयात दिले आहे. मुंबई मेट्रो वनकडून १ डिसेंबरपासून दर निश्चिती समितीनुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भाड्यात ५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. यात टोकन काढून सध्या एकमार्गी प्रवास करण्यासाठी १0, २0, ३0 आणि ४0 रुपयाचे असलेले भाडे १ डिसेंबरपासून अनुक्रमे १0, २0, २५, ३५ आणि ४५ रुपये होणार होते. तर रिटर्न प्रवासासाठी नवीन भाडे आकारणी अनुक्रमे १0, २0, ३0 आणि ३५ अशी होती. त्याचप्रमाणे महिन्याला ४५ ट्रिप पासच्या सुविधेतही ५0 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही वाढ तूर्त टळली आहे.