मेट्रोची आयडिया : दोन रुपयांत भाड्याने मिळणार सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:48 AM2020-02-22T01:48:39+5:302020-02-22T01:48:58+5:30
प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे, भविष्यात मुंबई मेट्रो वन इतर स्थानकांवरही सायकली
मनोहर कुंभेजकर।
मुंबई : मेट्रोच्या प्रवाशांनी सायकलीकडे वळावे, यासाठी मुंबई वन मेट्रोने भन्नाट आयडिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या प्रवाशांना दोन रुपये वाजवी दरात आता भाड्याने सायकली मिळणार आहेत. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोने प्रवास करणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना जागृतीनगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर दोन रुपये वाजवी दरात भाड्याने सायकली उपलब्ध होणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी या सायकल योजनेचा शुभारंभ होणार असून, जागृतीनगर मेट्रो स्टेशनवर दर तासाला फक्त दोन रुपये वाजवी दरात इच्छुक प्रवाशांना भाड्याने सायकली मिळतील.
प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे, भविष्यात मुंबई मेट्रो वन इतर स्थानकांवरही सायकली भाड्याने देण्याच्या पर्यायाचा विचार करेल, अशी माहिती या कंपनीच्या प्रवक्त्याने दिली. मेट्रोचे प्रवासी मायबीक अॅपचा वापर करून, या सेवेचा लाभ घेण्यासाठी जीपीआरएस वापरून दुचाकी अनलॉक करण्यासाठी अॅप प्रवाशांना स्वत: मार्गदर्शन करणार आहे. सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे. शेवटच्या मैलावरील कनेक्टिव्हिटीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मुंबई मेट्रो वन कटिबद्ध आहे. सायकल प्रवास करण्याचा हा हरित पर्याय त्यापैकी एक भाग आहे. मेट्रो प्रवासी निरोगी जीवनशैली टिकवून आणि त्यांच्या गंतव्य स्थानावर पोहोचण्यासाठी सदर सायकल प्रवास आधारवड ठरेल. प्रवास करण्याव्यतिरिक्त आपल्या लोकप्रिय शॉपिंगच्या ठिकाणी भेट देण्यासाठी सायकल प्रवास हा पर्याय ठरेल़
च्प्रवासी अनुभव वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित करून, मुंबई मेट्रो वनने मायबायक कंपनीबरोबर शेवटच्या मैलावरील कनेक्टिव्हिटीसाठी भाड्याने सायकली पुरविण्यासाठी करार केला.
च्गेल्या आॅगस्ट-नोव्हेंबर, २०१९च्या सुरुवातीस, मुंबई मेट्रो वनने गर्दी व्यवस्थापन व शेवटचा टप्पा शोधण्यासाठी एमएमडीआरए, ट्रॅफिक पोलीस, बेस्ट इत्यादी संस्थांसह जागतिक संसाधन संस्थाच्या नेतृत्वात एसटीएएमपीमध्ये भाग घेतला.
च्शहरातील नागरी एजन्सी, वाहतूक सेवा आणि वाहतूक पोलिस यांना एसटीएएमपी दरम्यान सहभागींनी सादर केलेल्या उपायांच्या आधारे अंमलबजावणीसाठी काही उपाय निवडले गेले.
च्१८८0 मध्ये रॉयल मेल या ब्रिटिश माणसाने पहिली सायकल चालविण्यास सुरुवात केली.