दाट लोकवस्तीच्या मुंबईत मेट्रो हाच पर्याय, आयआयएम बंगळुरूच्या माजी संचालकांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 07:14 AM2023-08-28T07:14:34+5:302023-08-28T07:14:55+5:30
दाट लोकवस्तीच्या मुंबईत मेट्रो हाच पर्याय, आयआयएम बंगळुरूच्या माजी संचालकांचे मत
मुंबई : मुंबईत लक्षावधी लोक राहात असून येथील रेल्वे, बस व इतर वाहतूक सेवांवर प्रचंड ताण येत आहे. मात्र, मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात जलद व सुखरूप प्रवासासाठी मेट्रो हाच पर्याय असल्याचे मत आयआयएम बंगळुरूचे माजी संचालक जी. रघुराम यांनी व्यक्त केले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने कुलाबा ते वांद्रे ते सिप्झ दरम्यान मेट्रो ३ प्रकल्प उभारण्यात येत आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून भुयारी तसेच एलिव्हेटेड धावणाऱ्या या मेट्रोमुळे दक्षिण मुंबईतून उपनगरात आणखी जलद पोहोचणे सोपे होणार आहे.
मेट्रो ३ च्या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी चर्चगेट येथे आयआयएम बंगळुरूचे माजी संचालक जी. रघुराम यांनी केली. त्यावेळी कामाची प्रगती पाहता त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.