Join us

मेट्रोने मुंबई खड्ड्यात घातली, चार महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात २४३६ खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 8:55 PM

मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीए कडून मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची उभारणी केली जात आहे.

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीए कडून मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची उभारणी केली जात आहे. मात्र या कामादरम्यान मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील रस्त्यांची पार वाट लागली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पाऊस तसेच मेट्रोच्या कामांमुळे गेल्या चार महिन्यात २४३६ खड्डे पडले असून हे खड्डे एमएमआरडीएने तात्काळ बुजवले आहेत.

मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. एमएमआरडीएच्या ताफ्यातील पश्चिम तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग देखील पालिकेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. मात्र मुंबईत एमएमआरडीए कडून मेट्रो तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे जोरदार सुरू असून १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात २४३६ खड्डे पडले आहेत. एमएमआरडीए मार्फत मेट्रो २ ब, ४, ४ अ, ५, ६, ७ अ व ९ या मेट्रो मार्गीकेचे काम प्रगतीपथावर आहे.  या कामादरम्यान हे खड्डे पडले आहेत.

मात्र असे असले तरी मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून सदर खड्डे वेळेत भरून घेण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच हे खड्डे भरण्यासाठी मुंबईसह इतर महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :मुंबई