मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे ४२ किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-१० वरील ९.२ किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-११ वरील १२.७ किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-१२ वरील २०.७ किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.
नरेंद्र मोदी यांनी मेट्रो भवनचे भूमिपूजन केले. ही ३२ मजली इमारत असून ३४० किलोमीटर अंतराच्या १४ मेट्रो मार्गाचे परिचालन आणि नियंत्रण करेल. कांदिवली पूर्व येथील बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. मेक इन इंडिया अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्घाटन करण्यात आले. महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करण्यात आले.
येत्या ४ ते ५ वर्षांत ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी दहिसर ते डीएन नगर - २अ कॉरिडॉर, डीएन नगर ते मंडाले मेट्रो-२ इ कॉरिडॉर, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ कॉरिडॉर, वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ कॉरिडॉर, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो-६ कॉरिडॉर आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-७ कॉरिडॉर या सहा मार्गिकांचे काम सुरू झाले आहे. या १३९ किलोमीटर लांबीच्या मेट्रो रेल्वेमुळे दररोज ५० लाख प्रवाशांना प्रवास करता येईल.
मेट्रो भवन
हरित भवन वैशिष्ट्यासह अद्ययावत परिचालन नियंत्रण केंद्र२०,३८७ चौरस मीटर भूखंडावर हे बांधण्यात येईल१,१४,०८८ चौरस मीटर बांधकामयोग्य क्षेत्रयापैकी २४,२९३ चौरस मीटर परिचालन नियंत्रण केंद्रासाठी राखीव९,६२४ चौरस मीटर मेट्रो प्रशिक्षण संस्थेसाठी८०,१७१ चौरस मीटर मेट्रोसंबंधी तांत्रिक कार्यालयांसाठीकार्यादेश तारखेपासून ३६ महिन्यांत प्रकल्प पूर्ण केला जाणार
नवीन मेट्रो डबामेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत पहिला मेट्रो डबाअद्ययावत डब्याची निर्मिती विक्रमी वेळेत-३६५ च्या तुलनेत ७५ दिवसनियमित डब्याची सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट-एका डब्यात सुमारे ३५० प्रवाशांची क्षमताडब्याची रुंदी ३.२ मीटर, उंची ३.९ मीटर आणि लांबी २२.६ मीटरदिव्यांगांसाठी अनुकूल, डब्याचे आयुष्य ३५ वर्षे, आवाज करत नाहीसायकली अडकवण्यासाठी विशेष जागाप्रवासी भागात स्मार्ट प्रकाश योजनेसह स्वयंचलित तापमान नियंत्रणडिझाईन स्पीड ताशी ९० किलोमीटर, परिचालन वेग ताशी ८० किलोमीटरस्वयंचलित देखरेख, दार उघडणे-बंद होणे, उष्णता, धूर आणि आगशोधक