प्रवाशांची संख्या झाली १ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांचा आकडा आता एक लाखांवर गेला आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मुंबई मेट्रो धावत आहे. १९ ऑक्टोबरपासून मेट्रो रेल मार्गावर आली. तत्पूर्वी ती कोरोनामुळे बंद होती. १९ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुल्या करण्यात आलेल्या मेट्रोने प्रवाशांना दिलासा दिला असतानाच मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत भर पडू लागली आहे. आजघडीला मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एक लाख झाली असून, प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. मेट्रोच्या फेऱ्या २४० वरून २५६ झाल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये वर्सोवा स्थानकातून पहिली मेट्रो सकाळी ६.५० वाजता सुटत असून, घाटकोपर स्थानकातून शेवटची मेट्रो १०.१५ वाजता सुटत आहे. मेट्रो सुरु होण्याच्या १५ मिनिटांपूर्वी मेट्रोची प्रवेशद्वारे खुली केली जात आहेत.