मेट्रो प्रवाशांना मिळाला ‘बेस्ट’चा हात; मार्गांत केले बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 06:09 AM2022-04-03T06:09:03+5:302022-04-03T06:09:30+5:30
मुंबईतील नव्या मेट्रो मार्गाच्या लोकार्पणानंतर आता प्रवाशांच्या सोयीसाठी काही बेस्ट मार्गात बदल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ या दोन्ही मार्गांच्या पहिला टप्प्याचे लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारपासून काही बेस्ट मार्गात बदल करण्यात आले आहेत. बेस्ट प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व आणि दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो २ अ सुरू करण्यात आले आहेत. बेस्ट उपक्रमाने प्रवासी संख्या वाढविण्यासाठी या मार्गांवर बससेवा उपलब्ध केली आहे. तसेच या बस सेवांव्यतिरिक्त दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत.
असा आहे बस मार्ग.. बसमार्ग क्र. ए-६४७
हा बसमार्ग शिवशाही प्रकल्प येथून मेट्रो-७ वरील आरे मेट्रो स्थानकादरम्यान नागरी निवारा प्रकल्प, सामना परिवार, वाघेश्वरी मंदिर, गोकुळधाम मार्केट, दिंडोशी आगार, विरवाणी इस्टेट, गोरेगांव चेकनाका मार्गे.
बसथांबे : गोरेगाव चेकनाका क्र.१, विरवाणी, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग नाका, दिंडोशी बसस्थानक, सत्र न्यायालय, गोकूळधाम मार्केट, वाघेश्वरी मंदिर, सामना परिवार, सुयश शॉपिंग सेंटर, नागरी निवारा संकल्प सोसायटी, इन्फिनिटी आय. टी. पार्क, मैत्री सोसायटी- नागरी निवारा विभाग १ व २ सातपुडा सोसायटी शिवशाही प्रकल्प / मंत्री पार्क.
बसमार्ग क्र.२७४ - हा बसमार्ग कांदिवली स्थानक (प.) आणि बंदर पाखाडी दरम्यान मेट्रो रेल-२ (ब) च्या डहाणूकरवाडी स्थानकाजवळून जाईल. बसथांबे - कांदिवली स्थानक (प.) देना बँक काळा मारुती मंदिर महात्मा गांधी तरण तलाव कांदिवलीगाव वैशाली भवन डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक कामराजनगर ज्ञानेश्वर विद्यालय नेताजीनगर पब्लिक स्कूल बंदर पाखाडीगाव.