मेट्रो रेल्वे धावणार कल्याण-भिवंडीपर्यंत, मेट्रो-५, मेट्रो-६ ला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:32 AM2017-10-25T06:32:55+5:302017-10-25T06:33:10+5:30

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो-५ आणि मेट्रो-६ या नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

Metro Rail will run till Kalyan-Bhiwandi, Metro-5, Metro-6 sanctioned | मेट्रो रेल्वे धावणार कल्याण-भिवंडीपर्यंत, मेट्रो-५, मेट्रो-६ ला मंजुरी

मेट्रो रेल्वे धावणार कल्याण-भिवंडीपर्यंत, मेट्रो-५, मेट्रो-६ ला मंजुरी

Next

मुंबई : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो-५ आणि मेट्रो-६ या नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या मेट्रो-५मुळे मुंबईतील मेट्रोचे जाळे कल्याणपर्यंत जाणार असून अंधेरी पश्चिम-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६मुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी आणखी एक मेट्रो रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
स्वामी समर्थ नगर (अंधेरी पश्चिम)-जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो-६च्या सविस्तर प्रकल्प अहवालास व त्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एकूण १४.४७ किलोमीटर लांबीच्या या उन्नत मेट्रो मार्गामुळे स्वामी समर्थ नगर, सीप्झ, एल अ‍ॅण्ड टी यासारखी वाणिज्यिक क्षेत्रे तसेच आयआयटी पवईचा परिसर मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. २०२१मध्ये ६.५० लाख तर २०३१पर्यंत ७.७० लाख प्रवासी या मार्गाशी जोडले जातील.
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गामुळे भिवंडी आणि कल्याणचा परिसर मुंबई महानगराशी जोडला जाणार आहे. या मार्गामुळे २०२१मध्ये २.३ लाख तर २०३१पर्यंत रोज तीन लाखांहून अधिक प्रवासी असतील. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांचे काम मार्च २०२१पर्यंत म्हणजे ४१ महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
>मेट्रो-५
ठाणे-भिवंडी-कल्याण
लांबी - २३.५० कि.मी
भाडे - १० ते ५० रुपये.
खर्च - ८ हजार २४० कोटी
एकूण स्थानके (१६)- कल्याण एपीएमसी, कल्याण स्टेशन, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोवेगाव एमआयडीसी, राजनौली गाव, टेमघर, ओसवाल वाडी, गणेश नगर, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम आणि कापूरबावडी.
मेट्रो -६
स्वामी समर्थ नगर (अंधेरी पश्चिम, लोखंडवाला) -जोगेश्वरी-विक्रोळी
लांबी - १४.४० कि.मी.
भाडे- १० ते ३० रुपये.
खर्च - ६ हजार ७१६ कोटी
एकूण स्थानके (१३)- स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, जोगेश्वरी (प.), जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, श्याम नगर, महाकाली लेणी, सीप्झ गाव, साकी विहार रोड, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूरमार्ग (प.) आणि विक्रोळी (पूर्व द्रुतगती मार्ग) अशी ही स्थानके असून कांजूरमार्ग येथे कार डेपो नियोजित आहे.

Web Title: Metro Rail will run till Kalyan-Bhiwandi, Metro-5, Metro-6 sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो